कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्लीत 9 वी आसिआन – भारत कृषी व वनीकरण मंत्रीस्तरीय बैठक आणि 10 वी आसिआन – भारत कृषी कार्यकारी गट बैठक

Posted On: 09 SEP 2026 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2026

9 वी आसिआन – भारत कृषी व वनीकरण मंत्रीस्तरीय बैठक 9 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्लीत झाली. या बैठकीत भारत आणि आसिआन देशांनी कृषी क्षेत्राचे भविष्य अधिक अन्नधान्य सुरक्षित, शाश्वत व लवचिक बनवण्याविषयीची वचनबद्धता व्यक्त केली. फिलिपिन्सचे कृषी विभाग सचिव फ्रान्सिस्को पी. टी लॉरेल आणि केंद्रिय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान बैठकीला सहअध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या बैठकीत व्यवहार्य, शेतकरी केंद्रीत सहकार्यावर आणि आसिआन – भारत यांच्यातील कृषी व वनीकरण क्षेत्रातील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यावर भर देण्यात आला.

आसिआन – भारत कृषी व वनीकरण सहकार्य कृती आराखडा 2026-2030 हा मध्यम कालावधीसाठीचा कृती आराखडा स्वीकारुन त्याची अंमलबजावणी करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. यामध्ये धोरणात्मक चर्चेपासून डिजिटल नवोन्मेष, तंत्रज्ञान सहकार्य, संयुक्त संशोधन, क्षमता उभारणी ते शेतकऱ्यांच्या परस्पर देशांना भेटीपर्यंतच्या व्यापक प्राधान्यक्रमांवर विचारविनिमय करण्यात आला.  

या बैठकीमध्ये हवामानबदल अनुकूल शेती, जल उत्पादकता, एआय आधारित डिजिटल शेती, मृदा आरोग्य, अन्न सुरक्षा, सुगीच्या हंगामानंतरचे व्यवस्थापन, चक्रिय जैवअर्थव्यवस्था, कृषीवनीकरण व लवचिक मूल्य साखळी ही व्यवहार्य व वाढत्या सहकार्यासाठीची प्रमुख क्षेत्रे निश्चित करण्यात आली. संशोधन संस्थां, तंत्रज्ञान विकासक, विस्तार संस्था, खाजगी क्षेत्र आणि शेतकरी यांच्यातील दृढ संपर्क कृषी क्षेत्रातील नवोन्मेषाचा वेगाने व्यापक स्वीकार होण्यासाठी आवश्यक असल्याच्या मुद्द्यावर मंत्र्यांनी भर दिला.  

बाजारपेठांमधील दळणवळण, मूल्यवर्धन आणि कृषी व वन मालवाहतूक, साठवणव्यवस्था भक्कम करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. हवामान बदल, तीव्र वातावरणीय बदल, भूराजकीय व आर्थिक अस्थिरता,  व्यापारातील अडचणी आणि सीमेपलिकडील कीड व रोग यासारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी परस्पर सहकार्य मजबूत करण्याची गरज असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.

बैठकीतील उल्लेखनीय घटना  म्हणजे इंडिया-आसिआन फ्रेंडशिप स्पाईक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अ‍ॅन्ड फॉरेस्ट्रीचे अनावरण  प्रकाशन. भारत – आसिआन यांची कृषी व वनीकरण सहकार्याप्रतीची समान वचनबद्धता व दीर्घकालिन भागीदारी यांचे हे  प्रतीक आहे.

कृषी व वनीकरण याविषयीची 10वी आसिआन – भारत मंत्रीस्तरीय बैठक 2028 मध्ये घेण्याबाबत बैठकीत सहमती झाली.

10 वी आसिआन – भारत कृषी कार्यकारी गटाची बैठक

आसिआन – भारत कृषी कार्यकारी गटाची 10 वी बैठक 8 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्लीत झाली. या बैठकीत 11 आसिआन सदस्य देशांच्या 45 प्रतिनिधींनी  एकत्र येऊन आसिआन – भारत यांच्यातील कृषी व वनीकरणातील सहकार्य मजबूत करण्याबाबत चर्चा केली.

भारत आणि फिलिपिन्स या कृती गटाच्या बैठकीचे सह अध्यक्ष होते. भारताच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व डीएआरइचे सचिव व आयसीएआरचे महासंचालक डॉ. एम. एल. जाट यांनी केले.

निलीमा चितळे/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2308542) अभ्यागत कक्ष : 8
Read this releasein: English , Gujarati , Urdu , Kannada