पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वनक्षेत्रातील सहकार्याबाबत भारत-जपान संयुक्त कार्यगटाची 7 वी बैठक बंगळुरू येथे संपन्न

Posted On: 08 SEP 2026 9:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  8 सप्टेंबर 2026

वनक्षेत्रातील सहकार्याबाबत भारत-जपान संयुक्त कार्य गटाची (जेडब्ल्यूजी) सातवी बैठक 8 सप्टेंबर 2026 रोजी बंगळुरू येथे पार पडली. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे अतिरिक्त महासंचालक (वने) रमेश कुमार पांडे यांनी केले, जपानच्या कृषी, वन आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाच्या वनीकरण संस्थेचे उप-महासंचालक शिमिझू कोतारो यांनी जपानी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.

या बैठकीत सहकार्याच्या तीन प्रमुख क्षेत्रांवर चर्चा झाली. 'ट्री आउटसाइड फॉरेस्ट' या अंतर्गत, दोन्ही बाजूंनी जंगलांबाहेरील वृक्ष संसाधनांचे मूल्यांकन, व्यवस्थापन आणि जनुकीय सुधारणा यावरील अनुभवांची देवाणघेवाण केली. वन अनुवंशशास्त्राबाबत चर्चा करताना अनुवंशिक संसाधनांचे संवर्धन, वृक्ष प्रजनन, लागवडीसाठी सुधारित रोपे/साहित्य आणि जनुकद्रव्याचे जतन यावर विशेष भर देण्यात आला. फॉरेस्ट स्टॅक अंतर्गत, दोन्ही बाजूंनी वन साठ्याचे मूल्यमापन आणि भू-स्थानिक आणि देखरेख तंत्रज्ञान यावर विचारांची देवाणघेवाण केली.

दोन्ही देशांनी 2015 मध्ये स्वाक्षरी केलेल्या सहकार्य करारा अंतर्गत 2027-2031 साठी पथदर्शी आराखड्याला मान्यता दिली आणि वन, जैवविविधता संवर्धन, संशोधन आणि क्षमता विकास या क्षेत्रात सहकार्य आणि संबंध दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला, 7 व्या संयुक्त कार्यगटाच्या बैठकीच्या इतिवृत्तावर स्वाक्षरी करून या बैठकीची सांगता झाली.

कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, दोन्ही शिष्टमंडळांनी बेंगळुरू येथील इन्स्टिट्यूट ऑफ वुड सायन्स अँड टेक्नॉलॉजीला भेट दिली आणि कर्नाटक वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर शिष्टमंडळ सदस्य 9 सप्टेंबर रोजी चंदन शेती फार्म, चंदन डेपो आणि प्रक्रिया युनिटला भेट देतील, त्यानंतर 10 तारखेला ते नागरहोळे व्याघ्र प्रकल्पाला भेट देतील. क्षेत्रीय भेटींमुळे खासगी शेतातील चंदन लागवड आणि वन्यजीव संवर्धन पद्धतींवरील अनुभवांची देवाणघेवाण करण्याची त्यांना संधी मिळेल.

 
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2308066) अभ्यागत कक्ष : 10