संरक्षण मंत्रालय
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह श्रीलंकेचा तीन दिवसीय दौरा करणार
Posted On:
06 SEP 2026 3:40PM by PIB Mumbai
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह 08 ते 10 सप्टेंबर 2026 या कालावधीत श्रीलंकेच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान संरक्षणमंत्री श्रीलंकेच्या नेतृत्वासोबत विविध विषयांवर चर्चा करतील तसेच कोलंबो येथे भारतीय प्रवासी समुदायाशी संवाद साधतील. संरक्षणमंत्री संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील.
भारत आणि श्रीलंका यांच्यात सखोल सांस्कृतिक व सभ्यताविषयक संबंध असून, प्रादेशिक सुरक्षा, संरक्षण, आर्थिक व व्यापारी सहकार्य तसेच दोन्ही देशांतील जनतेमधील दृढ संबंध या बहुआयामी भागीदारीचा आधार आहेत. आर्थिक संकटाच्या काळात भारताने श्रीलंकेला केलेली मदत तसेच 2025 मध्ये श्रीलंकेत आलेल्या डितवाह चक्रीवादळानंतर तातडीने प्रतिसाद देणाऱ्या देशांपैकी एक म्हणून भारताने केलेली मदत यामुळे द्विपक्षीय संबंधांना आणखी चालना मिळाली. यामुळे शेजारी प्रथम धोरणाप्रती भारताची सातत्यपूर्ण बांधिलकी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘महासागर’ अर्थात विविध प्रदेशांमध्ये सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर सहकार्याने सर्वांगीण प्रगती ही संकल्पना अधोरेखित झाली आहे.
संरक्षणमंत्र्यांचा श्रीलंका दौरा परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमध्ये, विशेषतः सागरी आणि संरक्षण क्षेत्रातील मजबूत भागीदारीसह, पारंपरिकदृष्ट्या दृढ आणि मैत्रीपूर्ण द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यास हातभार लावेल.
***
नेहा कुलकर्णी/नितिन गायकवाड/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2307268)
अभ्यागत कक्ष : 9