संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वायुदलाच्या सारंग हेलिकॉप्टरचे पथक एल अलामीन आंतरराष्ट्रीय एअर शोसाठी इजिप्तमध्ये दाखल

Posted On: 06 SEP 2026 12:59PM by PIB Mumbai

 

भारतीय हवाई दलाचे 'सारंग' हेलिकॉप्टर प्रात्यक्षिक पथक इजिप्तमध्ये आयोजित होणाऱ्या दुसऱ्या 'अल अलामेन आंतरराष्ट्रीय एअरशो'मध्ये सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहे. हा एअरशो 8 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान अल अलामेन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पार पडणार आहे.

सारंग हे जगातील एकमेव पाच हेलिकॉप्टरच्या साहाय्याने हवाई प्रात्यक्षिके सादर करणारे पथक आहे. हे पथक अत्यंत अचूकता, व्यावसायिकता आणि उच्च दर्जाचे उड्डाणकौशल्य दाखवत लयबद्ध हवाई कसरतींचे सादरीकरण करेल. या सहभागामुळे भारतीय हवाई दलाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाटचालीत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा जोडला गेला असून, भारत आणि इजिप्तमधील वाढत्या संरक्षण व राजनैतिक संबंधांचे हे प्रतीक आहे.

भारतातच विकसित आणि निर्मित झालेल्या 'ध्रुव' ॲडव्हान्स्ड लाईट हेलिकॉप्टरचा (ALH) वापर करणारे सारंग पथक, आपल्या कठीण फॉर्मेशन, अत्यंत जवळून उड्डाण करण्याच्या तंत्रासाठी आणि ताळमेळबद्ध हवाई कसरतींसाठी जगप्रसिद्ध आहे. ही प्रात्यक्षिके केवळ वैमानिकांचे असाधारण कौशल्य आणि शिस्तच दर्शवत नाहीत, तर भारताच्या स्वदेशी एरोस्पेस उद्योगाची ताकदही दाखवून देतात.

या एअरशोदरम्यान सारंग पथक आपले प्रसिद्ध 'डॉल्फिन लीप' हे प्रात्यक्षिक सादर करेल, तसेच 'स्पॉट स्टॉल टर्न' हे नवीन प्रात्यक्षिकही पहिल्यांदाच दाखवेल. या सहभागामुळे जगभरातील विमानप्रेमी आणि प्रेक्षकांना 'ध्रुव' हेलिकॉप्टरची बहुगुणी क्षमता व चपळता अनुभवता येईल, तसेच भारतीय हवाई दलाचे शौर्य आणि उतुंग जिद्द जवळून पाहण्याची संधी मिळेल.

***

नेहा कुलकर्णी/वैभवी जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2307133) अभ्यागत कक्ष : 14