पंतप्रधान कार्यालय
शिक्षकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकणारा केंद्रीय मंत्र्यांचा लेख पंतप्रधानांनी केला सामाईक; माहितीपासून आकलनाकडे आणि आकलनापासून प्रज्ञेकडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात शिक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका
Posted On:
05 SEP 2026 4:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लिहिलेला लेख सामाईक केला आहे.
भारतामध्ये शिक्षकांचा सन्मान करण्याची प्रदीर्घ परंपरा आजही कायम असून, ज्ञान देणाऱ्या व्यक्तींप्रती असलेला खोल आदर या परंपरेतून प्रतिबिंबित होतो, असे केंद्रीय मंत्री आपल्या लेखात सांगतात.
विद्यार्थ्यांना माहितीपासून आकलनाकडे आणि आकलनापासून प्रज्ञेकडे मार्गदर्शन करण्यात शिक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, यावर या लेखात प्रकाश टाकण्यात आला आहे. या दिशेने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, त्यामध्ये विद्यार्थ्याला शिक्षणाच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे:
“केंद्रीय शिक्षण मंत्री @JoshiPralhad यांनी सांगितले आहे की, भारतामध्ये शिक्षकांचा सन्मान करण्याची प्रदीर्घ परंपरा ज्ञान देणाऱ्या व्यक्तींप्रती असलेला खोल आदर प्रतिबिंबित करते.
माहितीपासून आकलनाकडे आणि आकलनापासून प्रज्ञेकडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात शिक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, त्यामध्ये विद्यार्थ्याला शिक्षणाच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.”
* * *
निलिमा चितळे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2306948)
अभ्यागत कक्ष : 10