युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "विकसित भारतासाठी नशा मुक्त युवा" या आवाहनाला प्रोत्साहन देण्यासाठी 89 व्या 'फिट इंडिया संडेज ऑन सायकल'चे आयोजन
Posted On:
04 SEP 2026 6:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2026
आरोग्यदायी आणि व्यसनमुक्त तरुणाईला प्रोत्साहन देण्यासाठी 'विकसित भारतासाठी नशा मुक्त युवा' या संकल्पनेवर आधारित 89 व्या 'फिट इंडिया संडेज ऑन सायकल'चे आयोजन 6 सप्टेंबर रोजी सूरत येथे करण्यात येणार आहे. यामध्ये फिटनेस, खेळ आणि समुदाय सहभागाला प्रोत्साहन दिले जाईल.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया या सायकलिंग उपक्रमाचे नेतृत्व करतील, तर गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी देखील यात सहभागी होतील.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'विकसित भारतासाठी नशा मुक्त युवा' या आवाहनाला पुढे नेत, 'फिट इंडिया संडेज ऑन सायकल'ची ही आवृत्ती आमच्या तरुणांना अंमली पदार्थांपासून दूर राहण्यासाठी आणि निरोगी व सक्रिय जीवनशैली स्वीकारण्याकरिता प्रोत्साहित करण्यासाठी समर्पित आहे. 'संडेज ऑन सायकल' आणि इतर फिटनेस उपक्रमांच्या माध्यमातून, फिट इंडिया निरोगी, आत्मविश्वासाने भरलेला, शिस्तबद्ध आणि 'विकसित भारत' घडवण्यासाठी वचनबद्ध असलेली पिढी तयार करण्यास मदत करत आहे," असे डॉ. मांडविया यांनी सांगितले.
स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंमली पदार्थांचे व्यसन हे देश आणि येथील तरुणासमोरील मोठे संकट असल्याचे अधोरेखित केले होते.
ही 89 वी आवृत्ती 'नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान' अंतर्गत 100 आठवड्यांच्या देशभरातील लोकसहभाग मोहिमेशी सुसंगत आहे. खेळ, फिटनेस, जागरूकता आणि समुदाय सहभागाच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्ध एक शाश्वत चळवळ उभारणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
सूरत येथील हा सायकलिंग कार्यक्रम सकाळी 6.00 वाजता मानगड चौक येथील सरदार पटेल पुतळ्यापासून सुरू होईल, मिनी बाजार आणि वराच्छा मुख्य रस्त्यावरून जाऊन सरथाणा प्राणीसंग्रहालयाजवळ समाप्त होईल.
या उपक्रमात पद्मश्री ऑलिम्पियन अचंता शरद कमल, अर्जुन पुरस्कार विजेती सरिता मोर, कुस्तीपटू शिवानी पवार आणि राष्ट्रकुल पदक विजेता राहुल मान यांच्यासह नामांकित खेळाडू सहभागी होणार आहेत.
* * *
निलिमा चितळे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2306761)
अभ्यागत कक्ष : 14