पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

इटलीच्या युद्ध पश्चात इतिहासात सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम केल्याबद्दल इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

Posted On: 04 SEP 2026 5:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 सप्‍टेंबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे इटलीच्या युद्ध-पश्चात इतिहासात सलग सर्वाधिक काळ पद भूषवणाऱ्या पंतप्रधान ठरल्याबद्दल अभिनंदन केले.

ही कामगिरी म्हणजे इटलीच्या जनतेचा त्यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आणि जनतेच्या आत्मविश्वासाचे  प्रतीक आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. मेलोनी यांची मैत्री भारत-इटली विशेष धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. दोन्ही देशांतील जनतेच्या समृद्ध भविष्यासाठी त्यांच्यासोबत निकटचे सहकार्य सुरू ठेवण्यास उत्सुक असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले. तसेच त्यांनी आगामी वर्षांत त्यांच्या निरंतर यशासाठी शुभेच्छा दिल्या

एक्सवरील एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी सामायिक केलेः

"माझ्या मित्र, पंतप्रधान मेलोनी यांचे इटलीच्या युद्ध-पश्चात इतिहासात सलग सर्वाधिक काळ पद भूषवणाऱ्या पंतप्रधान ठरल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. ही कामगिरी इटलीच्या जनतेचा त्यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आणि जनतेच्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे.

त्यांची मैत्री भारत-इटली विशेष धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यासाठीही महत्त्वपूर्ण ठरली आहे आणि आपल्या दोन्ही देशांतील जनतेच्या समृद्ध भविष्यासाठी आमचे निकटचे सहकार्य असेच पुढे नेण्यासाठी मी उत्सुक आहे.

येत्या वर्षांत त्यांच्या निरंतर यशासाठी माझ्याकडून शुभेच्छा.

@GiorgiaMeloni"

 

* * *

नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2306758) अभ्यागत कक्ष : 9