पंतप्रधान कार्यालय
प्रसिद्ध गुजराती संगीतकार गौरांग व्यास यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
गुजराती संगीतातील त्यांच्या अमूल्य योगदाने पंतप्रधानांनी केले स्मरण
Posted On:
03 SEP 2026 10:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 सप्टेंबर 2026
गुजराती संगीत जगतातील प्रसिद्ध संगीतकार गौरांग व्यास यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
गौरांग व्यास यांनी त्यांचे वडील अविनाश व्यास यांचा समृद्ध संगीताचा वारसा पुढे चालवत गुजराती संगीताच्या क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे आणि अढळ स्थान निर्माण केले होते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यांच्या निधनाने आज गुजरातमध्ये एका अत्यंत प्रतिभावान सर्जकाला गमावल्याची भावना निर्माण झाली असून, गुजराती संगीत क्षेत्रातील त्यांचे अमूल्य योगदान सदैव स्मरणात राहील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी दिवंगत आत्म्यास शांती लाभावी यासाठी प्रार्थनाही केली असून, आपल्या संवेदना शोकाकुल कुटुंब आणि त्यांच्या चाहत्यांसोबत असल्याची भावनाही व्यक्त केली आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश :
गुजराती संगीत जगतातील प्रसिद्ध संगीतकार श्री गौरांग व्यास यांच्या निधनाच्या बातमीने अत्यंत दुःख झाले.
आपले वडील अविनाश व्यास यांच्या समृद्ध संगीत परंपरेला पुढे नेत, त्यांनी गुजराती संगीताच्या क्षेत्रात स्वतःचे एक ळेवेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने गुजरातमध्ये एका प्रतिभावान सर्जकाला गमावल्याची भावना निर्माण झाली आहे. गुजराती संगीत क्षेत्रातील त्यांचे अमूल्य योगदान सदैव स्मरणात राहील.
दिवंगत आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना, तसेच माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबिय आणि त्यांच्या चाहत्यांसोबत आहेत....
ૐ शांती…!!"
"ગુજરાતી સંગીતજગતના જાણીતા સંગીતકાર શ્રી ગૌરાંગ વ્યાસના અવસાનથી અત્યંત દુઃખ થયું.
પિતા અવિનાશ વ્યાસની સમૃદ્ધ સંગીત પરંપરાને આગળ ધપાવી તેમણે ગુજરાતી સંગીતના ક્ષેત્રમાં પોતાનું આગવું સ્થાન બનાવ્યું હતું. તેમના અવસાનથી ગુજરાતે એક પ્રતિભાશાળી સર્જકને ગુમાવ્યાની લાગણી થાય છે. ગુજરાતી સંગીતક્ષેત્રે તેમનું અમૂલ્ય યોગદાન હંમેશાં યાદ રહેશે.
સદ્ગતના આત્માની શાંતિ માટે પ્રાર્થના તથા શોકગ્રસ્ત પરિવારજનો અને તેમના વિશાળ ચાહકવર્ગને સાંત્વના…
ૐ શાંતિ…!!"
* * *
नेहा कुलकर्णी/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2306745)
अभ्यागत कक्ष : 15
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam