उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन 5 सप्टेंबर रोजी चेन्नई दौऱ्यावर

Posted On: 04 SEP 2026 4:48PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 सप्‍टेंबर 2026

 

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन 5 सप्टेंबर 2026 रोजी तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे एक दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत.

उपराष्ट्रपती या दौऱ्यादरम्यान, 'इंडिया व्हॉल्व्हज 2026' या राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेत सहभागी होतील. हृदयाच्या झडपांशी संबंधित (Valvular) आणि संरचनात्मक हृदयरोगांच्या उपचारपद्धतींमध्ये प्रगती घडवून आणण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय, उपराष्ट्रपती गिंडी येथे 'इंडिया व्हॉल्व्ह रजिस्ट्री'चे उद्घाटन करतील.

चेन्नईतील वल्लुवर कोट्टम येथे आयोजित कार्यक्रमात 'दिनमलार' वृत्तपत्राच्या प्रकाशनाच्या 75व्या वर्षानिमित्त एका विशेष टपाल तिकीटाचे प्रकाशनही उपराष्ट्रपतींच्या हस्ते केले जाणार आहे.

 

* * *

निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2306729) अभ्यागत कक्ष : 12