ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशात कांद्याची पुरेशी उपलब्धता: 'कांदा एक्सप्रेस' आणि रस्ते वाहतुकीद्वारे देशभरात कांद्याचे सुनियोजितपणे वितरण सुरु

Posted On: 01 SEP 2026 4:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 सप्‍टेंबर 2026

 

कांद्याची पुरेशी उपलब्धता आणि मोसमी दरवाढीच्या दबावाचे नियंत्रण करण्यासाठी सरकारने रेल्वे रेक (कांदा एक्स्प्रेस) आणि रस्ते वाहतुकीचा समावेश असलेल्या हायब्रीड वाहतूक मॉडेलच्या माध्यमातून प्रमुख उपभोक्ता केंद्रांपर्यंत कांद्याच्या बफर (राखीव) साठ्याचा टप्प्याटप्प्याने पुरवठा सुरु केला आहे. 'किंमत स्थिरीकरण निधी' (पीएसएफ) अंतर्गत कांद्याच्या साठ्याचे वितरण करण्याची प्रक्रिया 24 ऑगस्ट 2026 रोजी नाफेड आणि एनसीसीएफद्वारे सुरू झाली.

या उपक्रमाचा भाग म्हणून, नाशिकमधून 'कांदा एक्सप्रेस'च्या दोन खेपा रवाना करण्यात आल्या. 450 मेट्रिक टन कांदा घेऊन जाणारी पहिली रेल्वेगाडी 27 ऑगस्ट 2026 रोजी रात्री उशिरा दिल्लीला पोहोचली. त्यानंतर यापैकी 140 मेट्रिक टन कांदा वाराणसी, लखनौ, चंदीगड आणि अमृतसर येथे वितरित करण्यात आला, तर उर्वरित साठा दिल्ली-एनसीआर क्षेत्रात वितरित करण्यात आला.

840 मेट्रिक टन कांदा घेऊन दुसरी रेल्वे गाडी 31 ऑगस्ट 2026 रोजी चेन्नईला पोहोचली. त्याच वेळी, बाजारातील सद्यस्थिती आणि किमतींचा कल लक्षात घेऊन, उपलब्धता सुधारण्याच्या आणि हंगामी भाववाढीचा दबाव नियंत्रित करण्याच्या उद्देशाने, सुमारे 1,000 मेट्रिक टन कांदा रस्ते मार्गाने प्रमुख बाजारपेठांमध्ये पाठवला जात आहे.  

Sl. No.

Region

District Combination

1

North

Chennai PDS 1 + Chennai PDS 2

2

North

Tiruvallur + Kancheepuram+ Chengalpattu + Vellore + Ranipet + Tirupattur

3

North

Tiruvannamalai + Villupuram +Kallakurichi

4

West

Coimbatore + Nilgiris

5

West

Tiruppur + Erode

6

West

Salem + Namakkal +Dharmapuri + Krishnagiri

7

East

Cuddalore + Mayiladuthurai

8

East

Nagapattinam + Tiruvarur

9

Central

Ariyalur+ Perambalur

10

Central

Tiruchy + Karur

11

Central

Thanjavur + Pudukkottai

12

South

Madurai + Dindigul

13

South

Theni + Virudhunagar

14

South

Sivagangai + Ramanatnapuram

15

South

Tirunelveli + Tenkasi

16

South

Tuticorin + Kanyakumari

 

एनसीसीएफ, नाफेड, केंद्रीय भांडार दुकाने आणि फिरत्या व्हॅनद्वारे कांद्याची किरकोळ विक्री 35 रुपये किलो या दराने सुरु आहे. यामुळे ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा उपलब्ध होत आहे. आतापर्यंत एकूण सुमारे 669 मेट्रिक टन कांद्याची विक्री झाली. यात 'ई-नाम' (e-NAM) पोर्टल आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सद्वारे बाजारपेठेतील प्रचलित घाऊक दराने विकला गेलेला 223 मेट्रिक टन कांदा, तसेच देशभरात किरकोळ विक्रीच्या माध्यमातून विकला गेलेला  446 मेट्रिक टन कांदा, समाविष्ट आहे.

तसेच, 3,400 शेतकऱ्यांना 210 कोटी रुपये थेट देण्यात आले. यामुळे त्यांना वेळेवर पैसे मिळाले. ग्राहकांना पुरेसा आणि परवडणारा कांदा उपलब्ध करून देताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. रेल्वे डब्यातून मोठ्या प्रमाणात कांद्याची वाहतूक आणि विक्री करताना मालाची गळती रोखण्यासाठी आणि सुरक्षेच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने कठोर सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत.

 

* * *

सुषमा काणे/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2305495) अभ्यागत कक्ष : 14