पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

7.8% जीडीपी वाढ साध्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राचे केले अभिनंदन; वाढत्या आर्थिक आत्मविश्वासावर टाकला प्रकाश

Posted On: 01 SEP 2026 2:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 सप्‍टेंबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 7.8% सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर साध्य केल्याबद्दल राष्ट्राचे अभिनंदन केले. पंतप्रधानांनी एका व्हिडिओ संदेशांद्वारे मजबूत आर्थिक आकडेवारीवर प्रकाश टाकला आणि हे आकडे वाढता आर्थिक आत्मविश्वास दर्शवतात यावर भर दिला.

X या समाज माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधानांनी लिहिले आहे:

"7.8% वाढ.

मजबूत आकडेवारी.

त्याहूनही अधिक मजबूत आत्मविश्वास.”

 

* * *

आशिष सांगळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2305442) अभ्यागत कक्ष : 8