संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री नवी दिल्लीत संरक्षण क्षेत्रातील 16 सार्वजनिक उपक्रमांच्या वार्षिक कामगिरीचा आढावा घेणार
Posted On:
31 AUG 2026 2:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2026
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 1 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील 16 उपक्रमांच्या (DPSUs) वार्षिक कामगिरीचा आढावा घेतील; आणि नवीन स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याचे आणि निर्यात वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित करतील. या कार्यक्रमादरम्यान, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL), माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL), गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड (GRSE), भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) आणि मिश्र धातू निगम लिमिटेड (MIDHANI) या सात DPSUs चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, आर्थिक वर्ष 2025-26 साठी सरकारच्या इक्विटी शेअर्सवरील लाभांशाचे धनादेश संरक्षण मंत्र्यांना सादर करतील.
याप्रसंगी, राजनाथ सिंह चार पुस्तकांचे प्रकाशन करतील. जसे की आत्मनिर्भर DPSU - आत्मनिर्भरतेच्या दिशेने DPSUsची वाटचाल; ‘दिशा’ (DISHA) - संरक्षण तंत्रज्ञान आणि आधुनिक उत्पादन प्रक्रियांबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव आणि माहिती देण्यासाठी DPSUs चा एक उपक्रम, HAL चा आधुनिकीकरण आराखडा (Modernisation roadmap of HAL) आणि HALचा स्वदेशीकरण आराखडा (Indigenisation Roadmap of HAL).
उल्लेखनीय बाब म्हणजे, 2025-26 या आर्थिक वर्षात संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांची (DPSUs) कामगिरी प्रशंसनीय राहिली आहे. त्यांची एकूण उलाढाल 1.29 लाख कोटी रुपये इतकी होती, जी 2024-25 मधील आकडेवारीच्या तुलनेत 15.4 टक्क्यांनी अधिक आहे. 2025-26 मध्ये या उपक्रमांनी 23,136 कोटी रुपयांचा एकत्रित 'कर-पश्चात नफा' नोंदवला असून यात मागील वर्षाच्या तुलनेत 15.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, 2025-26 मध्ये या उपक्रमांनी निर्यातीत मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 151.2 टक्क्यांची वाढ साध्य केली.
* * *
आशिष सांगळे/सविता म्हस्कर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2304931)
अभ्यागत कक्ष : 24