शिक्षण मंत्रालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात देशभरातील शालेय विद्यार्थ्यांसोबत साजरे केले रक्षाबंधन
Posted On:
28 AUG 2026 5:01PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शालेय विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाची मूलभूत मूल्ये - प्रेम, काळजी आणि संरक्षण ही भावना पर्यावरणाप्रतीही बाळगण्याचे आवाहन केले. हा सण प्रेमाच्या बंधनाचे प्रतीक असून कुटुंबातील सदस्य, मित्र आणि अगदी झाडांसह कोणासोबतही हा बंध जोडला जाऊ शकतो, असे त्या म्हणाल्या. राष्ट्रपती भवनात देशभरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसोबत त्यांनी रक्षाबंधन साजरे केले.
पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल पाहून चिंता व्यक्त करत, जगण्यासाठी आवश्यक असलेला पर्यावरणाचा समतोल टिकवून ठेवण्यासाठी झाडे आणि वनस्पतींनाही राखी बांधण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत हे अधोरेखित करत त्यांनी झाडे लावण्याचा आणि त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प हा आयुष्यभराचा संकल्प बनला पाहिजे, असे सांगितले.


या विशेष रक्षाबंधन सोहळ्यात 89 विद्यार्थी आणि 32 शिक्षकांसह एकूण 122 जण सहभागी झाले होते. 17 राज्ये, एक केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय विद्यालय संघटन (केव्हीएस) आणि नवोदय विद्यालय समिती (एनव्हीएस) येथून आलेल्या प्रतिनिधींमध्ये 13 विशेष गरजा असलेल्या मुलांचा समावेश होता.


राष्ट्रीय राजधानीच्या दौऱ्याचा एक भाग म्हणून, या विद्यार्थ्यांनी 27 ऑगस्ट 2026 रोजी प्रधानमंत्री संग्रहालयाला भेट दिली. आज राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमानंतर, विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती भवन आणि अमृत उद्यानाच्या मार्गदर्शित दौऱ्यातही भाग घेतला. ते रायपिथोरा सांस्कृतिक संकुलात आयोजित 'द लाईट अँड द लोटस: रेलिक्स ऑफ द अवेकन्ड वन' या प्रदर्शनालाही भेट देणार असून तेथे प्रदर्शनात ठेवलेल्या पवित्र बुद्ध अवशेषांचे दर्शन घेतील. 29 ऑगस्ट 2026 रोजी हे विद्यार्थी शैक्षणिक दौऱ्याचा एक भाग म्हणून राष्ट्रीय विज्ञान केंद्र, राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि इंडिया गेटलाही भेट देतील.
***
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2304412)
अभ्यागत कक्ष : 7