पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक संस्कृत दिनानिमित्त पंतप्रधानांनी  दिल्या शुभेच्छा

Posted On: 28 AUG 2026 12:06PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रावण पौर्णिमेनिमित्त 'जागतिक संस्कृत दिना'च्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताचे ज्ञान, विचार आणि सर्जनशीलतेचे अखंड  माध्यम राहिलेल्या संस्कृत भाषेच्या कालातीत समृद्धीचा आपण उत्सव साजरा करतो, असे मोदी यांनी नमूद केले आहे. "या विशेष दिवशी, भारत आणि जगभरातील संस्कृत भाषेचा अभ्यास आणि अध्यापन करणाऱ्या, आणि या भाषेत सामावलेला कालातीत ठेवा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सर्व लोकांची आपण प्रशंसा करतो," मोदी यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:

विश्वसंस्कृतदिवसस्य शुभाशयाः।

अद्य, श्रावणपूर्णिमादिने, वयं संस्कृतस्य चिरन्तन-समृद्धेः उत्सवम् आचरामः। एषा भाषा भारतस्य ज्ञानस्य, चिन्तनस्य, सर्जनशीलतायाः च निरन्तर-संवाहिका आसीत्। तस्याः सकारात्मकः प्रभावः बहुषु क्षेत्रेषु अद्यापि द्रष्टुं शक्यते। 

एतस्मिन् विशिष्टे दिने, भारते विश्वे च ये संस्कृतं पठन्ति, पाठयन्ति तथा च एतस्यां निहितं कालातीतं निधिं अग्रिमसन्तत्यै प्रापयितुं प्रयत्नशीलाः सन्ति तान् सर्वान् वयं प्रशंसामः।

***

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

नेहा कुलकर्णी/राजश्री आगाशे/परशुराम कोर


(Release ID: 2304234) अभ्यागत कक्ष : 15