पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ए. बालकृष्णन जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Posted On: 27 AUG 2026 1:23PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 ऑगस्‍ट 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विवेकानंद केंद्राचे अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून सेवा बजावलेल्या ए. बालकृष्णन जी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. बालकृष्णन यांनी आपल्या आयुष्याची पाच दशकांहून अधिक वर्षे स्वामी विवेकानंदांच्या आदर्श आणि राष्ट्रसेवेसाठी समर्पित केली होती, याची आठवण पंतप्रधानांनी काढली. ईशान्य भारताशी त्यांचे विशेष आणि सखोल नाते होते. शैक्षणिक, सामाजिक तसेच राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पंतप्रधान म्हणाले. 

पंतप्रधानांनी 'X' वर पोस्ट केले: 

"विवेकानंद केंद्राचे अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून कार्य केलेल्या ए. बालकृष्णन यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले आहे. बालकृष्णन जी यांनी आपल्या जीवनाची 50 हून अधिक वर्षे स्वामी विवेकानंदांचे विचार आणि समाजसेवेसाठी अर्पित केली. विवेकानंद केंद्राचे सुरुवातीच्या काळातील जीवनव्रती म्हणून त्यांनी देशभरात अहोरात्र कार्य केले. ईशान्य भारताशी त्यांचे विशेष आणि जवळचे नाते होते. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि राष्ट्रउभारणीच्या क्षेत्रात बहुमूल्य योगदान दिले. विवेकानंद केंद्राचे संपूर्ण कुटुंब आणि त्यांच्या तमाम चाहत्यांप्रती माझ्या भावपूर्ण संवेदना. ॐ शांती.

@vkendra"

 

* * *

नेहा कुलकर्णी/वैभवी जोशी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2303699) अभ्यागत कक्ष : 14