पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

तेलंगणातील सूर्यपेट येथे झालेल्या अपघातातल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Posted On: 26 AUG 2026 3:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 ऑगस्‍ट 2026

 

तेलंगणातील सूर्यपेट येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच, जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी कामना त्यांनी केली आहे.

पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिले आहे की,

तेलंगणातील सूर्यपेट येथे झालेल्या अपघाताची बातमी ऐकून दुःख झाले. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रती माझ्या संवेदना आहेत. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो:

पंतप्रधान @narendramodi

 

* * *

निलिमा चितळे/राजेश शिरभाते/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2303500) अभ्यागत कक्ष : 10