गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला सिलीगुडी कॉरिडॉरच्या सुरक्षेचा आढावा


सिलीगुडी कॉरिडॉरमध्ये सुरू असलेल्या, सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या स्थितीचा गृहमंत्र्यांकडून आढावा

पीआयओ उपक्रम, लोकसंख्येतील बदल, बेकायदेशीर स्थलांतर आणि सीमाविषयक बाबींशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा

प्रविष्टि तिथि: 22 AUG 2026 8:30PM by PIB Mumbai


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सिलीगुडी कॉरिडॉरच्या सुरक्षेचा सर्वंकष आढावा घेतला. या बैठकीला गृह मंत्रालय, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, भारतीय सैन्यदल, सीमा सुरक्षा बल, सशस्त्र सीमा बल आणि रेल्वे सुरक्षा बल यांसारख्या केंद्रीय व राज्य मंत्रालयांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक उपस्थित होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत, मल्टी एजन्सी सेंटरच्या सिलीगुडी  कॉरिडॉरबाबतच्या 'स्टँडिंग फोकस ग्रुप'ने आतापर्यंत झालेली प्रगती आणि या कॉरिडोअरची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठीच्या आपल्या शिफारशी सादर केल्या.

CR5_2397.JPG.jpeg

या बैठकीदरम्यान केंद्रीय गृहमंत्र्यांनी, सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या, सिलीगुडी कॉरिडॉरमध्ये सुरू असलेल्या सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. याशिवाय त्यांनी भारतविरोधी घटकांच्या कारवाया, लोकसंख्येतील बदल, बेकायदेशीर घुसखोरी आणि सीमा भागांशी संबंधित विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा केली.

या बैठकीत गृहमंत्री अमित शाह यांनी सीमा सुरक्षेसाठी 'चौफेर दृष्टिकोनाच्या' संकल्पनेवर भर दिला आणि सर्व यंत्रणांना तिची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. या  कॉरिडॉरमधील पायाभूत सुविधा प्रकल्पांचे गांभीर्य अधोरेखित करत, शाह यांनी उपस्थित सर्व यंत्रणांना प्रलंबित असलेली सर्व कामे वेळेच्या मर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

HMA03255.JPG.jpeg

उपस्थित सर्व यंत्रणांना आपल्या संस्थांची संख्या वाढवून या  कॉरिडॉरमधील आपला प्रभाव अधिक मजबूत करण्याचे निर्देश शाह यांनी दिले. त्यांनी या  कॉरिडॉरवरील सर्व 'अतिसंवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणांच्या' सुरक्षेचाही आढावा घेतला व त्यांच्या संरक्षणासाठी सर्व आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले. याशिवाय, त्यांनी सिलीगुडी कॉरिडॉर अतिक्रमणमुक्त ठेवण्याच्या सूचना दिल्या.

सिलीगुडी  कॉरिडॉरमधील बेकायदेशीर घुसखोरी रोखण्यासाठी सर्व शक्य त्या उपाययोजना करण्याच्या गरजेवरही शाह यांनी विशेष भर दिला.

***

माधुरी पांगे/वैभवी जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2302411) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Gujarati , Odia