आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी एच वन एन वन इन्फ्लूएंझाच्या सद्यस्थितीचा आणि तयारीचा आढावा घेतला, दक्षता आणि काटेकोर देखरेखीवर दिला भर

प्रविष्टि तिथि: 21 AUG 2026 4:10PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी आज देशातील एच वन एन वन इन्फ्लूएंझाच्या सद्यस्थितीचा आणि तयारीचा आढावा घेतला, यामध्ये प्रामुख्याने दिल्लीवर विशेष भर देण्यात आला. या बैठकीला दिल्लीचे आरोग्यमंत्री डॉ. पंकज कुमार सिंह देखील उपस्थित होते. 

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राष्ट्रीय निगराणी आणि साथरोगविषयक परिस्थिती, इन्फ्लूएंझा सदृश आजार आणि तीव्र श्वसन संसर्गाचा कल, चाचण्या आणि प्रयोगशाळांमधील देखरेख आणि ऋतुमानानुसार उद्भवणाऱ्या इन्फ्लूएंझाच्या रुग्णांचे  व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य सुविधांच्या सज्जतेचा आढावा घेतला. नड्डा यांनी इन्फ्लूएंझाचा कल असल्यास त्यावर बारकाईने लक्ष ठेवून सातत्यपूर्ण दक्षता, अतिशय काटेकोर देखरेख, सक्रिय सज्जता, रुग्णांच्या संख्येत झालेली  असामान्य वाढ किंवा अनेक केसेस एकाच वेळेस उद्भवल्यास त्यांना वेळेवर ओळखून त्यांचे व्यवस्थापन करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.    

संपूर्ण देशाबरोबरच दिल्लीतील आरोग्यविषयक सुविधांच्या सज्जतेचा देखील आढावा यावेळी घेण्यात आला, यामध्ये रुग्णालयातील खाटांची उपलब्धता, अतिदक्षता सुविधा, ऑक्सिजनयुक्त खाटा, व्हेंटिलेटर्स, अत्यावश्यक औषधे, निदान साधने आणि इतर अत्यावश्यक साहित्य यांचा समावेश होता. नड्डा यांनी  विशेषतः ज्या रुग्णांना विशेष किंवा गंभीर काळजीची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी पुरेशा वाढीव क्षमतेच्या आणि अखंडित संदर्भ यंत्रणेच्या महत्त्वावर भर दिला.

राष्ट्रीय राजधानीत स्थानिक स्वराज्य संस्थांचा सक्रिय सहभाग आणि संपूर्ण शासन या समन्वित दृष्टिकोनानुसार क्षयरोगाच्या  रुग्णांचे निदान वाढल्याचे अधोरेखित करताना, केंद्रीय मंत्र्यांनी सर्व स्तरांवरील लोकप्रतिनिधींनी सक्रिय सहभाग घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तथ्याधारित आणि पुराव्यांवर आधारित माहितीचा प्रसार करण्यासोबतच, समुदायाचा सहभाग अधिक मजबूत करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय एच वन एन वन इन्फ्लूएंझा सह हंगामी इन्फ्लूएंझासाठी परिणामकारक देखरेख, लवकर निदान आणि सक्रिय सज्जता सुनिश्चित करण्यासाठी तसेच वैद्यकीय व्यवस्थापन वेळेवर करता यावे या दृष्टीने राज्य सरकार/केंद्र शासित प्रदेश, रुग्णालये, प्रयोगशाळा आणि इतर संबंधितांशी नजीकच्या संपर्कात आहे. या बैठकीला केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव; अतिरिक्त सचिव (सार्वजनिक आरोग्य) डॉ. राकेश गुप्ता; दिल्लीचे आरोग्य सचिव  रुपेश कुमार ठाकूर आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

***

सुवर्णा बेडेकर/भक्‍ती सोनटक्के/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2302127) आगंतुक पटल : 4
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Kannada