पंतप्रधान कार्यालय
जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
पंतप्रधानांनी जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची यांच्या अलीकडील भारत भेटीदरम्यान झालेल्या फलदायी चर्चेला उजाळा दिला
मेक इन इंडियाअंतर्गत संरक्षण सहविकास आणि सह उत्पादन यात भारतीय कंपन्या व स्टार्ट-अप्ससोबत भागीदारी करण्याच्या जपानसमोरील संधींवर पंतप्रधानांनी दिला भर
प्रविष्टि तिथि:
20 AUG 2026 10:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2026
भारताच्या अधिकृत दौऱ्यावर असलेले जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइजुमी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
या भेटीत पंतप्रधानांनी, जुलै 2026 मध्ये 16 व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेनिमित्त अलीकडेच भारतभेटीवर आलेल्या जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेला उजाळा दिला आणि भारत व जपान यांच्यात संरक्षण सहयोगाला सातत्याने मिळत असलेल्या गतीबद्दल कौतुक केले.
भारत आणि जपान यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीला अधिक दृढ करण्यासाठीचा आपला दृष्टिकोन यावेळी पंतप्रधानांनी मांडला आणि हिंद-प्रशांत तसेच त्यापलीकडे क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि समृद्धी यासाठी भारत-जपान संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
पंतप्रधानांनी संरक्षण क्षेत्रात विशेषतः मेक इन इंडियाअंतर्गत सह-विकास आणि सह-उत्पादनासाठी भारतीय कंपन्या आणि स्टार्ट-अप्ससोबत भागीदारी करण्याच्या जपानसमोरील संधींवर भर दिला.
जपानचे संरक्षण मंत्री कोइजुमी यांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्यातील प्रगतीबाबत पंतप्रधानांना माहिती दिली आणि भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करण्याबाबत जपान सरकारच्या निरंतर वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
सुषमा काणे/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2301791)
आगंतुक पटल : 7