शिक्षण मंत्रालय
युवा संगम टप्पा VII च्या नोंदणीची मुदत 31 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवली
प्रविष्टि तिथि:
19 AUG 2026 9:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2026
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शिक्षण विभागाने, युवा संगम टप्पा VII साठी ऑनलाइन नोंदणीची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवली आहे. या मुदतवाढीमुळे देशभरातील पात्र तरुणांना या अनोख्या युवा आदान-प्रदान कार्यक्रमात नोंदणी करून सहभागी होण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.
उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि नेहरू युवा केंद्र संघटन (NYKS) चे स्वयंसेवक तसेच तरुण व्यावसायिकांसह 18 ते 30 वर्षे वयोगटातील इच्छुक तरुण अधिकृत युवा संगम पोर्टल https://ebsb.aicte-india.org वर नोंदणी करू शकतात. युवा संगम टप्पा VII साठी ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख याआधी 18 ऑगस्ट 2026 होती.
युवा संगम टप्पा VII अंतर्गत IIT, IIM, केंद्रीय विद्यापीठे आणि NIT यांसह देशभरातील 20 उच्च शिक्षण संस्थांची प्रमुख समन्वयक संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. या संस्था युवा आदान-प्रदान कार्यक्रमाचे आयोजन आणि समन्वय साधणार आहेत.
निवडलेले सहभागी त्यांच्या जोडीदार राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाच ते सात दिवसांचे (प्रवासाचे दिवस वगळून) शैक्षणिक आणि सांस्कृतिक दौरे करतील. या भेटीदरम्यान, सहभागींना स्थानिक परंपरा, शैक्षणिक संस्था, प्रशासकीय उपक्रम, नवोन्मेष परिसंस्था, उद्योग, वारसा स्थळे आणि समाज जीवन यांची प्रत्यक्ष माहिती मिळेल.
युवा संगम टप्पा VII साठी राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या जोड्या:
|
Sl No.
|
State/UT
|
Paired HEI
|
Paired State/UT
|
Paired HEI
|
|
1.
|
Uttar Pradesh
|
BHU Varanasi
|
Keralam
|
IIT Palakkad
|
|
2.
|
Madhya Pradesh
|
SPA Bhopal
|
Karnataka
|
CU Karnataka
|
|
3.
|
Assam
|
IIT Guwahati
|
Telengana
|
CU Hyderabad
|
|
4.
|
Goa
|
NIT Goa
|
Mizoram
|
CU Mizoram
|
|
5.
|
Rajasthan
|
IIT Jodhpur
|
Sikkim
|
Sikkim University
|
|
6.
|
J&K, Ladakh
|
NIT Srinagar
|
Maharashtra
|
IIT Bombay
|
|
7.
|
West Bengal
|
IIT Kharagpur
|
Uttarakhand
|
HBNU, Srinagar
|
|
8.
|
Chandigarh
|
IISER Mohali
|
Gujarat
|
CU Gujarat
|
|
9.
|
Himachal Pradesh
|
NIT Hamirpur
|
Odisha
|
IIM Sambalpur
|
|
10.
|
Delhi
|
Delhi University
|
Tamil Nadu
|
CU Tamil Nadu
|
युवा संगम हा 'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रमा अंतर्गत चालवला जाणारा एक प्रमुख युवा आदान-प्रदान कार्यक्रम आहे. युवा संगमचा उद्देश विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील तरुणांमध्ये भावनिक बंध अधिक दृढ करणे, परस्पर संवाद वाढवणे आणि एकमेकांबद्दलची समज विकसित करणे हा आहे. हा उपक्रम एकमेकांशी जोडी केलेल्या विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील तरुणांच्या नियोजित भेटींचे आयोजन करून ‘विविधतेत एकता’ या भावनेला प्रोत्साहन देतो. या भेटींमुळे सहभागी तरुणांना भारताची समृद्ध सांस्कृतिक, भाषिक, शैक्षणिक आणि विकासात्मक विविधता प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळते.
हा कार्यक्रम पाच प्रमुख विषयांवर किंवा 5 Pवर आधारित आहे — पर्यटन, परंपरा, प्रगती, परस्पर संपर्क आणि प्रौद्योगिकी (तंत्रज्ञान). या उपक्रमांमधून सहभागी तरुणांना भारताच्या विविधतेची सखोल ओळख होते आणि तिच्याबद्दल आदर निर्माण होतो. तसेच, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) 2020 च्या उद्दिष्टांनुसार, विविध प्रदेशांतील तरुणांमध्ये परस्पर समज वाढवून राष्ट्रीय एकतेची भावना बळकट केली जाते.
* * *
सुषमा काणे/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2301386)
आगंतुक पटल : 11