पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कोलकाता येथील आगीच्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दुःख

प्रविष्टि तिथि: 19 AUG 2026 3:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑगस्‍ट 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथे आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

या दुर्घटनेत ज्यांना आपले प्रियजन गमवावे लागले, त्याबद्दल पंतप्रधानांनी संवेदना -शोक व्यक्त केला. तसेच जखमींच्या शीघ्र आरोग्यासाठी प्रार्थना केली. ते म्हणाले की, स्थानिक प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे. 

पंतप्रधान कार्यालयाने समाज माध्‍यम ‘एक्स’वर  पोस्ट केले;

“कोलकाता येथे आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीची बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले. या दुर्घटनेत आपले प्रियजन गमावलेल्यांप्रती माझ्या संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना. स्थानिक प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे: पंतप्रधान @narendramodi”

 

* * *

सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2301188) आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Bengali-TR , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam