इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतातील सर्वात मोठा सेमीकंडक्टर कार्यक्रम 17 ते 19 सप्टेंबर 2026 दरम्यान नवी दिल्लीतील 'यशोभूमी' येथे होणार
सेमिकॉन इंडिया 2026 - सिलिकॉन ते सिस्टिम्स : परिसंस्था उभारणी
प्रविष्टि तिथि:
18 AUG 2026 9:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट 2026
सेमिकॉन इंडियाच्या पाचव्या आवृत्तीचे अधिकृत उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 17 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्लीतील यशोभूमी अर्थात इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्सपो सेंटर येथे होणार आहे.

भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्राच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठताना, सेमिकॉन इंडिया 2026 जागतिक सेमीकंडक्टर परिसंस्थेतील प्रमुख भागधारक, सरकार आणि उद्योगातील नेते, उद्योग तज्ज्ञ, शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी, सरकारी अधिकारी आणि विद्यार्थ्यांना एकाच व्यासपीठावर आणणार आहे.
सेमिकॉन इंडिया कार्यक्रम अंतर्गत इंडिया सेमीकंडक्टर मिशन आयएसएम द्वारे भारताच्या सेमीकंडक्टर प्रवासाला मोठी गती मिळाली आहे. देशात एक मजबूत आणि सक्षम सेमीकंडक्टर परिसंस्था उभारण्याच्या उद्देशाने सेमिकॉन 1.0 अंतर्गत 12 प्रकल्प मंजूर करण्यात आले होते. याव्यतिरिक्त, भारतात मजबूत आणि सक्षम सेमीकंडक्टर परिसंस्थेच्या विकासाला गती देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने पुढील टप्पा, म्हणजेच सेमिकॉन 2.0 ला मंजुरी दिली आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध प्रकारच्या ज्ञानवर्धक उपक्रमांचा समावेश असेल. यामध्ये मुख्य व्याख्याने, तज्ञांची चर्चासत्रे, अनौपचारिक संवाद सत्रे, विविध देशांच्या प्रतिनिधींसोबतच्या गोलमेज परिषदा इत्यादींचा समावेश असेल. हे कार्यक्रम सेमीकंडक्टर क्षेत्रातील नवोपक्रम आणि विकासाला गती देण्यासाठी संवाद आणि सहकार्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देतील.

ही परिषद सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स परिसंस्थेशी संबंधित विविध विषयांवर प्रकाश टाकेल, ज्यामध्ये खालील बाबींचा समावेश असेल:
प्रतिष्ठित सरकारी अधिकाऱ्यांव्यतिरिक्त, या वर्षीच्या कार्यक्रमात अनेक आघाडीच्या कंपन्यांमधील उद्योग क्षेत्रातील नेत्यांचाही सहभाग असेल. यामध्ये एसएमएल, अल्पाईड मटेरियल्स, टेराडाईन, इन्फिनियन, इबारा, जाबील, आयबीएम रिसर्च, एनएक्सपी, टाटा इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रॉन, मर्क केजीएए, रॅपिडस्, लाम रिसर्च, सीजी पॉवर, यनो मिंड़ा एडव्हाटेस्ट, आयनॉक्स एअर प्रॉडक्ट्स, सेमी, होरिबा स्टेक, स्क्रिन, एव्हरस्पिन टेक्नोलॉजिस, ब्रुवर सायन्स, पोलार सेमीकंडक्टर, टोकयो इलेक्ट्रॉन, इमरजन्स एआय आणि इतर अनेक कंपन्यांचा समावेश आहे.
सेमिकॉन इंडिया 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी आता नोंदणी सुरू झाली आहे.
येथे नोंदणी करा: https://portal.semiconindia.org/register
शैलेश पाटील/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2301018)
आगंतुक पटल : 11