भारतीय निवडणूक आयोग
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे लोकशाही प्रक्रिया आणि निवडणूक व्यवस्थेची माहिती घेऊन जागरूक सहभाग वाढवण्यासाठी शैक्षणिक क्षेत्राला आवाहन
प्रविष्टि तिथि:
17 AUG 2026 8:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2026
भारतीय निवडणूक आयोगाने आज बिहारमधील पटणा येथील ज्ञान भवन येथे आयोजित “मतदार साक्षरता मंडळे आणि ECINet” या विषयावरील परिषदेत “मतदार साक्षरता मंडळे (ELC 2.0)” हा उपक्रम सुरू केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी या परिषदेला संबोधित केले. निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास दृढ करण्यात, निवडणूकविषयक साक्षरता वाढवण्यात, तसेच लोकशाही प्रक्रिया आणि निवडणूक व्यवस्थेची योग्य माहिती तसेच समज असलेल्या नागरिकांच्या जागरूक सहभागाला प्रोत्साहन देण्यात, शैक्षणिक संस्था महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे त्यांनी सांगितले.
ज्ञानेश कुमार यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले की, भारतातील निवडणुका भारतीय संविधान, कायदे आणि निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सूचनांनुसार काटेकोरपणे घेतल्या जातात.
निवडणूक प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांवर राजकीय पक्ष, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या सर्व टप्प्यांवर सातत्याने होणाऱ्या देखरेखीखाली निवडणुका पारदर्शक पद्धतीने घेतल्या जातात. भारताची निवडणूक व्यवस्था, लोकशाही मूल्ये, मतदार नोंदणी, मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया तसेच निवडणूक आयोगाची भूमिका आणि कार्यपद्धती यांची विद्यार्थ्यांना आणि तरुण मतदारांना माहिती करून देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
यावेळी ईएलसी च्या नव्या बोधचिन्हाचेही अनावरण करण्यात आले. :“Learn Democracy. Lead Democracy”, (लोकशाही जाणून घ्या. लोकशाहीचे नेतृत्व करा)हे नवे घोषवाक्य तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांना केवळ लोकशाही समजून घेण्यासाठीच नव्हे, तर तिच्या प्रक्रियेत अर्थपूर्ण सहभाग नोंदवून लोकशाहीच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा उद्देश अधोरेखित करते.
भारताच्या व्यापक शैक्षणिक व्यवस्थेचा विचार करता, या उपक्रमाचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. देशात सुमारे 15 लाख शाळा असून, त्यामध्ये जवळपास 25 कोटी विद्यार्थी आणि 1 कोटीहून अधिक शिक्षक आहेत. उच्च शिक्षण क्षेत्रात सुमारे 1,500 विद्यापीठे आणि सुमारे 70,000 शैक्षणिक संस्था आहेत. या संस्थांमध्ये अंदाजे 4.33 कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
ईएलसीज, निवडणूक प्रक्रियेच्या विविध टप्प्यांबाबत माहिती प्रसारित करण्याचे व्यासपीठ म्हणूनही कार्य करतील. यामध्ये मतदार नोंदणी, मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेसह ECINET ॲप आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या इतर महत्त्वपूर्ण उपक्रमांची माहिती देण्यात येईल.
* * *
सुषमा काणे/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2300673)
आगंतुक पटल : 18