पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक प्रगतीसाठी सामूहिक निर्धार, एकता आणि परस्पर सहकार्य यांचे सामर्थ्य अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
Posted On:
17 AUG 2026 9:40AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक कल्याण आणि राष्ट्राच्या प्रगतीला गती देण्यातील सामूहिक निर्धार आणि विचारांची एकता यांचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले.
पंतप्रधानांनी ‘एक्स’वरील संदेशात लिहिले आहे:
सामूहिक संकल्प आणि एकतेच्या सामर्थ्यानेच देश पुढे वाटचाल करत असतो. हीच भावना भारताच्या प्रगती आणि समृद्धीचा मजबूत पाया आहे.
समानी व आकूतिः समाना हृदयानि वः।
समानमस्तु वो मनो यथा वः सुसहासति॥"
आपल्या सर्वांचे संकल्प समान असायला हवेत, आपली अंतःकरणे एकतेच्या भावनेने जोडलेली असावीत, तेव्हाच आपण परस्पर सहकार्य आणि समान वागणुकीच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील राहू.
***
NitinFulluke / BhaktiSontakke / DIneshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2300292)
अभ्यागत कक्ष : 49
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam