पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत 17-18 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्लीत भारत मंडपम इथे ब्रिक्स पर्यावरण कार्यगट बैठकीचे आयोजन करणार


ब्रिक्स सदस्य देश सामायिक पर्यावरणीय प्राधान्यांवर चर्चा करणार; शाश्वत आणि लवचिक भविष्यासाठी सहकार्य बळकट करण्यावर भर

प्रविष्टि तिथि: 16 AUG 2026 11:00AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 ऑगस्‍ट 2026

 

भारत 18.08.2026 रोजी नवी दिल्ली इथे ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची 12वी बैठक आयोजित करणार आहे. त्याआधी 17.08.2026 रोजी ब्रिक्स पर्यावरण कार्यगट आणि हवामान बदल व शाश्वत विकास संपर्क गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. हा कार्यक्रम भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपद 2026 अंतर्गत ‘लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता निर्माण’ या व्यापक विषयावर आयोजित केला जाणार आहे.

ही बैठक केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, सदस्य देशांतले मंत्री, वरिष्ठ अधिकारी, धोरणनिर्माते आणि तज्ज्ञ यांना सखोल चर्चा, सहमती आणि पर्यावरणीय सहकार्य बळकट करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देईल.

पहिल्या दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होईल, त्यात उद्घाटन सत्र तसेच पर्यावरण कार्यगट आणि हवामान बदल व शाश्वत विकास संपर्क गटाच्या प्राधान्यांवर चर्चा होईल.

दुसऱ्या दिवशी, मंत्रिस्तरीय स्तरावर चर्चा होऊन निष्कर्ष दस्तऐवजावर विचारविनिमय केला जाईल आणि विषयाधारित चर्चांद्वारे ब्रिक्स सदस्य देशांची पर्यावरणीय सहकार्य आणि शाश्वत विकासासाठीची सामूहिक बांधिलकी अधोरेखित केली जाईल. भारताने आपल्या अध्यक्षपदाच्या काळात पर्यावरण कार्यगटासाठी चार प्रमुख प्राधान्य क्षेत्रे निश्चित केली आहेत:

प्राधान्य 1: शाश्वत जीवनशैलीचा प्रसार

जाणीवपूर्वक उपभोग आणि समुदायाधारित पद्धतींमधून शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देणे, तसेच ज्ञान, सर्वोत्तम पद्धती आणि यशोगाथा सामायिक करून नाविन्यपूर्ण उपाय विकसित करणे.

प्राधान्य 2 : वनीकरण, वणवा व्यवस्थापन आणि आपत्ती लवचिकता

जमिनीचे पुनर्संचयन, प्रगत माहिती संकलन, निरीक्षण, क्षमता विकास आणि एकात्मिक हरित उपक्रमांद्वारे सामायिक आव्हानांना प्रतिसाद देणे. तसेच वणवा प्रतिबंध, तयारी, लवकर ओळख आणि जलद प्रतिसाद यावर भर.

प्राधान्य 3 : चक्रीय अर्थव्यवस्था

कचरा व्यवस्थापनासाठी मजबूत विस्तारित उत्पादक जबाबदारीची धोरणे विकसित करणे आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर सुनिश्चित करणे, यामुळे चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

प्राधान्य 4 : अनुकूलन

परंपरागत ज्ञानावर आधारित लोककेंद्रित आणि समुदाय-नेतृत्वाखालील हवामान अनुकूलनासाठी सहकार्य वाढवणे, सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण आणि धोरणात्मक निष्कर्षांवर भर.

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने मार्च ते जुलै 2026 या कालावधीत आभासी बैठक, तांत्रिक सत्र, वेबिनार आणि संवाद यांच्या माध्यमातून चर्चा सुरू केली होती. संसाधन कार्यक्षमता आणि चक्रीय अर्थव्यवस्था, कार्बन बाजारपेठ आणि अनुकूलन उद्दिष्टे, तसेच जमिनीचे ऱ्हास, वाळवंटीकरण, दुष्काळ आणि वणवा व्यवस्थापन या विषयांवरही वेबिनार आयोजित करण्यात आले. या चर्चांमुळे 17-18 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या प्रत्यक्ष बैठकीसाठी महत्त्वाची पायाभरणी झाली.

 

पार्श्वभूमी

ब्रिक्स पर्यावरण कार्यगटाची स्थापना 2015 मध्ये मॉस्को येथे झालेल्या पहिल्या ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान करण्यात आली. सदस्य देशांमध्ये पर्यावरणीय प्राधान्यांवर चर्चा, अनुभवांची देवाणघेवाण आणि सामूहिक कृती मजबूत करण्यासाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे.

हवामान बदल व शाश्वत विकास संपर्क गटाची स्थापना 2024 मध्ये ब्रिक्स देशांमधील हवामान विषयक सहकार्य वाढवण्यासाठी करण्यात आली.

 

* * *

नितीन फुल्लुके/निखिलेश चित्रे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2300110) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Malayalam