पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
पंतप्रधानांनी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचे शौर्य, त्याग आणि अतूट समर्पणाचे केले स्मरण
प्रविष्टि तिथि:
15 AUG 2026 6:46AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्यदिनानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. हा राष्ट्रीय उत्सव आपल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांच्या अतुलनीय धैर्याची, अथक संघर्षाची आणि मातृभूमीप्रती असलेल्या समर्पणाची आठवण करून देतो, ज्यांच्यामुळे देशाला वसाहतवादी राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले, असे त्यांनी नमूद केले.
स्वातंत्र्यसैनिकांनी पाहिलेली स्वप्ने आजही आपल्याला प्रेरणा देत असून, विकसित भारताचे ध्येय साकारण्यासाठी आपण त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करून एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.
140 कोटी भारतीयांच्या सामर्थ्याने आपला देश विविध क्षेत्रांत प्रगतीची नवी शिखरे गाठत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आगामी काळात ही विकासाची वाटचाल आणखी वेगाने पुढे जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधानांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले:
“स्वातंत्र्यदिनानिमित्त देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा.
वसाहतवादी राजवटीचा अंत सुनिश्चित करणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचे धैर्य, त्याग आणि अतूट समर्पण यांचे आपण कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो. विकसित भारताच्या निर्मितीसाठी आपण एकत्रितपणे कार्य करत असताना, त्यांनी पाहिलेली स्वप्ने आजही आपल्याला प्रेरणा देत आहेत.
140 कोटी भारतीयांच्या सामर्थ्याने आपला देश विविध क्षेत्रांत प्रगतीची नवी शिखरे गाठत आहे. आगामी काळात ही विकासयात्रा आणखी वेगाने पुढे जावो.”
***
जयदेवी पुजारी स्वामी / नेहा कुलकर्णी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2299726)
आगंतुक पटल : 30