राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पारशी नववर्षानिमित्त दिल्या शुभेच्छा
Posted On:
14 AUG 2026 6:10PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पारशी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे:-
"पारशी नववर्ष – ‘नवरोझ’च्या मंगल प्रसंगी मी देशातील आणि परदेशातील सर्व नागरिकांना, विशेषतः पारशी बंधू आणि भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा देते.
नवरोझ हा सण नवीन आरंभ आणि आशेच्या पुनरुज्जीवनाचे प्रतीक आहे. आनंद आणि सौहार्द्र यांचा सुरेख संगम असलेला हा सण आपल्याला सहअस्तित्व आणि मानवतेच्या सेवेची शिकवण देतो. पारशी समुदायाने आपली उद्योजकता आणि परोपकाराच्या भावनेने भारताच्या विकासात उल्लेखनीय योगदान दिले आहे.
हा पवित्र सण सर्व नागरिकांना सर्वसमावेशक आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी एकत्र कार्य करण्याची प्रेरणा देईल, असा माझा ठाम विश्वास आहे. हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी घेऊन येवो."
राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करावे:
***
सुवर्णा बेडेकर/भक्ती सोनटक्के/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2299581)
अभ्यागत कक्ष : 39