गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जनगणना 2027 साठीची कामे

प्रविष्टि तिथि: 12 AUG 2026 9:48PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 ऑगस्‍ट 2026

 

जनगणना 2027 चा पहिला टप्पा, म्हणजेच 'गृहसूची आणि गृहगणना' हा टप्पा, 31 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आधीच पूर्ण झाला आहे. उर्वरित राज्यांमध्ये जनगणनेचा पहिला टप्पा सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. तसेच, भारत सरकारच्या 3 ऑगस्ट 2026 रोजीच्या राजपत्रित अधिसूचनेनुसार, जनगणनेचा दुसरा टप्पा म्हणजेच 'लोकसंख्या गणना' लडाख केंद्रशासित प्रदेश, जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील बर्फाच्छादित भाग आणि हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या राज्यांमधील बर्फाच्छादित भागांमध्ये 1 सप्टेंबर 2026 ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडेल; तर त्याची पुनरीक्षण फेरी 1 ऑक्टोबर 2026 ते 5 ऑक्टोबर 2026 दरम्यान आयोजित केली जाईल. नागरिकांसाठी 17 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत स्व-गणना (self-enumeration) करण्याचा पर्याय देखील उपलब्ध असेल.

जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्याच्या अंमलबजावणीसाठी माहिती संकलनाकरिता मोबाईल अ‍ॅप्स आणि 'जनगणना व्यवस्थापन आणि देखरेख प्रणाली' (CMMS) पोर्टलसह इतर डिजिटल मंचांचा वापर करण्यात येत आहे. जनगणनेच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाइन वेब पोर्टलद्वारे उत्तरदात्यांना स्व-गणनेची सुविधा देण्यात आली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लागणारी डिजिटल साधने विकसित करण्यात आली आहेत.

राज्ये/केंद्रशासित प्रदेश सरकारांच्या समन्वयाने आणि अधिसूचित वेळापत्रकानुसार जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यासाठी मास्टर ट्रेनर्स, फील्ड ट्रेनर्स, प्रगणक, पर्यवेक्षक  इत्यादींचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे किंवा प्रगतीपथावर आहे.

जनगणना कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मनुष्यबळ मदत, तांत्रिक पायाभूत सुविधा, जनगणना कर्मचाऱ्यांना मानधन देणे इत्यादींसाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत एकूण 4102 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

निलिमा चितळे/शैलेश पाटील/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2298694) आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Tamil , English , Urdu , हिन्दी , Assamese , Punjabi , Gujarati