संरक्षण मंत्रालय
पुढील पिढीच्या अत्याधुनिक समुद्रतटीय गस्त नौकेचे जलावतरण
(यार्ड 3037, श्रुती) मेसर्स जीआरएसई, कोलकाता
Posted On:
11 AUG 2026 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2026
आज, 11 ऑगस्ट 2026 रोजी कोलकाता येथील 'जीआरएसई' मध्ये, 'यार्ड 3037' (श्रुती) या पुढील पिढीच्या अत्याधुनिक समुद्रतटीय गस्त नौकेचे (एनजीओपीव्ही)जलावतरण मनिका साधू यांच्या हस्ते करण्यात आले. 'कंट्रोलर ऑफ वॉरशिप प्रॉडक्शन अँड ॲक्विझिशन' व्हाईस ॲडमिरल संजय साधू यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमातून भारतीय नौदलाची समृद्ध परंपरा दिसून आली. या प्रसंगी भारतीय नौदल, संरक्षण मंत्रालय आणि 'जीआरएसई'चे वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
'एनजीओपीव्ही' जहाजांची बांधणी एकाच वेळी दोन गोदींमध्ये (गोवा येथील 'जीएसएल' आणि कोलकाता येथील 'जीआरएसई') केली जात आहे. स्वदेशी बनावटीची ही जहाजे सागरी देखरेख, शोध आणि बचाव कार्य, सागरी मालमत्तेचे संरक्षण, मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण (एचएडीआर), तसेच चाचेगिरीविरोधी मोहिमा यांसारख्या विविध प्रकारच्या कार्यांसाठी सध्याच्या 'ओपीव्ही' आणि 'एनओपीव्ही' जहाजांच्या ताफ्याला बळकटी देतील. या जहाजांची नावे भारताच्या समृद्ध वारशावर आधारित आहेत. त्यानुसार, चार वेदांचा संदर्भ असलेल्या 'श्रुती' हे नाव या जहाजाला देण्यात आले आहे. या जहाजाच्या बोधचिन्हावर 'उर्सा मेजर' (सप्तर्षी) तारकासमूह आणि लाल-पांढऱ्या रंगाचे दीपगृह दर्शवण्यात आले आहे.
अत्याधुनिक नौकेचे आज झालेले जलावतरण भारतीय नौदलाच्या स्वदेशी जहाजबांधणीच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरले आहे. तसेच, ही घटना केंद्र सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक इन इंडिया' या उपक्रमांच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे.
(1)NOWH.jpeg)
(1)7LKO.jpeg)
(1)MDR1.jpeg)
(1)14E3.jpeg)
सुवर्णा बेडेकर/पर्णिका हेदवकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2297981)
अभ्यागत कक्ष : 58