आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रमाविषयी अद्ययावत माहिती

प्रविष्टि तिथि: 11 AUG 2026 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2026

प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रम (पीएमएनडीपी) सध्या देशातील सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 44 संलग्न जिल्ह्यांसह एकूण 751 जिल्ह्यांमध्ये 13,535 हिमोडायलिसिस यंत्रसामुग्रीने  सुसज्ज केंद्रे आहेत. देशभरामध्‍ये एकूण 1,856 हिमोडायलिसिस केंद्रांमध्‍ये उपचार केले जातात.  

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून या कार्यक्रमाचा नियमित आढावा घेतला जातो. कोणतेही डायलिसिस केंद्रे बंद पडलेले आढळल्यास सुधारणात्मक कारवाई करण्यासाठी ही बाब संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या निदर्शनास आणली जाते.

‘सार्वजनिक आरोग्य’ आणि ‘रुग्णालये’ हे राज्यांच्या अखत्यारीतील विषय आहेत. मात्र, केंद्र सरकार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) डायलिसिस सेवांसह आरोग्यसेवा पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य प्रदान करते.

देशभरातील जिल्हा रुग्णालये आणि इतर आरोग्य सुविधांमध्ये डायलिसिस केंद्रे स्थापन करून तिथे गरजू,  पात्र रुग्णांना मोफत डायलिसिस सेवा मिळावी  यासाठी  हिमोडायलिसिस सुविधा  उपलब्धता सुधारण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रम (पीएमएनडीपी) सुरू करण्यात आला. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या अहवालानुसार 30.06.2026 पर्यंत हा कार्यक्रम सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 751 जिल्ह्यांमध्ये (44 संलग्न जिल्ह्यांसह) 13,535 हिमोडायलिसिस मशीन्सनी सुसज्ज असलेल्या 1856 हिमोडायलिसिस केंद्रांमार्फत हा कार्यक्रम राबवला जात आहे.

या योजने अंतर्गत, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून त्यांच्या वार्षिक कार्यक्रम अंमलबजावणी योजनांमध्ये (पीआयपी) सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांच्या आधारे डायलिसिस केंद्रे, स्थापन करण्यात आली आहेत. या योजना त्रुटी विश्लेषणाच्या (गॅप ॲनालिसिस) आधारावर तयार केल्या जातात. या प्रस्तावांवर राष्ट्रीय कार्यक्रम समन्वय समितीच्या बैठकांमध्ये विचार केला जातो आणि कार्यवाहीच्या नोंदीद्वारे (आरओपी) मंजुरी कळवली जाते. प्रधानमंत्री राष्ट्रीय विकास कार्यक्रमांतर्गत स्थापित केलेल्या डायलिसिस केंद्रांची राज्य आणि केंद्रशासित प्रदेशनिहाय एकूण संख्या गेल्या दोन वर्षांत नव्याने समाविष्ट केलेल्या केंद्रांसह परिशिष्ट-1 मध्ये दिली आहे.

आरोग्य मंत्रालय, सामायिक आढावा मिशन (सीआरएम) आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटींद्वारे या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे वेळोवेळी निरीक्षण करते. अशा पुनरावलोकनांदरम्यान, कार्यरत नसलेले डायलिसिस केंद्र आढळल्यास ती बाब संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या निदर्शनास आणून देऊन आवश्यक सुधारात्मक कार्यवाही करण्याची सूचना दिली जाते. डायलिसिस केंद्रे वेळेवर कार्यान्वित करण्याची, डायलिसिस तंत्रज्ञांसह पुरेसे प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करण्याची जबाबदारी संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारची आहे. तसेच  ज्याठिकाणी अंमलबजावणी भागीदाराची नियुक्त केलेली असेल, तिथे  अंमलबजावणी भागीदाराचे दायित्व  आहे.

परिशिष्ट 1

गेल्या दोन वर्षांत प्रधानमंत्री राष्ट्रीय विकास कार्यक्रमांतर्गत (पीएमएनडीपी) स्थापित केलेल्या डायलिसिस केंद्रांची राज्य/केंद्रशासित प्रदेशनिहाय एकूण संख्या

S. No.

States/UTs

FY 2024-25

FY 2025-26

1

A&N lslands

8

8

2

Andhra Pradesh

59

61

3

Arunachal Pradesh

11

11

4

Assam

54

74

5

Bihar

38

38

6

Chandigarh

1

1

7

Chhattisgarh

35

39

8

D&NH/DD

2

2

9

Delhi

7

16

10

Goa

16

18

11

Gujarat

272

282

12

Haryana

21

21

13

Himachal Pradesh

24

24

14

Jammu & Kashmir

23

29

15

Jharkhand

24

24

16

Karnataka

200

214

17

Kerala

111

113

18

Ladakh

2

2

19

Lakshadweep

4

4

20

Madhya Pradesh

67

70

21

Maharashtra

65

158

22

Manipur

9

9

23

Meghalaya

5

5

24

Mizoram

4

5

25

Nagaland

4

7

26

Odisha

67

68

27

Puducherry

2

2

28

Punjab

40

40

29

Rajasthan

35

35

30

Sikkim

4

4

31

Tamil Nadu

141

146

32

Telangana

95

101

33

Tripura

8

8

34

Uttar Pradesh

75

75

35

Uttarakhand

19

19

36

West Bengal

69

73

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2297836) आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali-TR , Punjabi , Tamil