युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'माय भारत'द्वारे युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी सरकारचे प्रयत्न बळकट; डिजिटल प्लॅटफॉर्मवर 2.46 कोटींहून अधिक युवकांची नोंदणी

प्रविष्टि तिथि: 06 AUG 2026 9:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2026

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय 'माय भारत' या व्यासपीठाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित डिजिटल सेवा, अनुभवाधारित शिक्षणाच्या संधी आणि ग्रामीण तसेच दुर्गम भागांपर्यंत तळागाळात पोहोचून, युवा सक्षमीकरणाला अधिक बळ देत आहे. स्थापनेपासून 'माय भारत'  या डिजिटल व्यासपीठावर 2.46 कोटींहून अधिक युवकांनी नोंदणी केली आहे. तसेच, सुमारे 25,000 अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रमांमध्ये 1.22 लाखांहून अधिक युवकांनी सहभागासाठी नोंदणी केली आहे. राज्यनिहाय आणि केंद्रशासित प्रदेशनिहाय एकूण नोंदणीचा तपशील परिशिष्टात देण्यात आला आहे.

या व्यासपीठावर कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित 'एआय-सक्षम सीव्ही बिल्डर' यांसारखी सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच, देशभरातील 780 हून अधिक जिल्हा युवा कार्यालये आणि सामाईक सेवा केंद्र यांच्या व्यापक जाळ्याचा उपयोग करून, विशेषतः ग्रामीण आणि आकांक्षी जिल्ह्यांतील  युवकांना स्वयंसेवा, कौशल्य विकास, इंटर्नशिप आणि नेतृत्व विकासाच्या संधी अधिक सुलभपणे उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

'माय भारत' व्यासपीठ सुरू झाल्यापासून सुमारे 25,000 अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रमांमध्ये 1.22 लाखांहून अधिक युवकांनी नोंदणी केली असून, त्यांना 'माय भारत' पोर्टलद्वारे डिजिटल पडताळणी केलेली प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली आहेत.

याशिवाय, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय पंतप्रधान इंटर्नशिप योजने (PMIS) अंतर्गत युवकांना जोडण्यासाठी 'माय भारत' व्यासपीठावरील स्वतंत्र स्वयंसेवा सुविधेचा उपयोग करत आहे. 16 जुलै 2026 पर्यंत, 'माय भारत' पोर्टलवरून 98,632 युवकांना नोंदणी व अर्ज करण्यासाठी पीएमआयएस पोर्टलकडे पुनर्निर्देशित करण्यात आले आहे.

परिशिष्ट

'माय भारत' (MY Bharat) व्यासपीठावरील राज्यनिहाय व केंद्रशासित प्रदेशनिहाय नोंदणीचा तपशील.

ANNEXURE

State/UT-wise Registration on the MY Bharat Platform

State/UT

Total  Registrations

Andaman and Nicobar Islands

28794

Andhra Pradesh

814350

Arunachal Pradesh

46277

Assam

646655

Bihar

691531

Chandigarh

77271

Chhattisgarh

565384

Delhi

680862

Goa

52322

Gujarat

928092

Haryana

755169

Himachal Pradesh

303408

Jammu & Kashmir

862526

Jharkhand

346639

Karnataka

817057

Kerala

586790

Ladakh

39653

Lakshadweep

6452

Madhya Pradesh

1432089

Maharashtra

1518436

Manipur

42648

Meghalaya

50376

Mizoram

69977

Nagaland

45104

Odisha

592246

Puducherry

85275

Punjab

625705

Rajasthan

2039230

Sikkim

47643

Tamil Nadu

1502286

Telangana

403426

Dadra and Nagar Haveli and Daman and Diu

23005

Tripura

123306

Uttar Pradesh

2506907

Uttarakhand

317906

West Bengal

849514

State not mentioned

4127831

Total

24652142

ही माहिती युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी गुरुवारी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

राधिका अघोर/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2295793) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Telugu