कोळसा मंत्रालय
कोळसा मंत्रालयाच्या सल्लागार समितीने व्यावसायिक कोळसा खाणकामात सुधारणा आणि खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्याबाबत केली चर्चा
प्रविष्टि तिथि:
06 AUG 2026 11:16AM by PIB Mumbai
कोळसा मंत्रालयाशी संलग्न असलेल्या, संसदीय सदस्यांच्या सल्लागार समितीची, बुधवारी, ‘व्यावसायिक कोळसा खाणकामात सुधारणा आणि त्यात खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवणे’ या विषयांवरील चर्चेसाठी बैठक झाली. केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षांत, सुरू करण्यात आलेल्या अनेक सुधारणांपैकी, ‘व्यावसायिक कोळसा खाणकाम’’ हे एक उत्कृष्ट उदाहरण असल्याचे, केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले. व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावाच्या 14 फेऱ्या याआधीच पूर्ण झाल्या असून, सध्या 15 व्या फेरीची लिलाव प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. व्यावसायिक कोळसा खाणकामामुळे कोळसा क्षेत्र अधिक स्पर्धात्मक आणि कार्यक्षम बनले असल्याचे ते पुढे म्हणाले. पारदर्शक लिलाव प्रक्रियेमुळे स्पर्धा आणि गुंतवणुकीला चालना मिळाली असून, यामुळे भारताच्या कोळसा क्षेत्राचा कायापालट झाला असल्याचे रेड्डी यांनी नमूद केले. अधिक जागरूकता आणि व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी कोळसा मंत्रालय, ‘प्रचारफेरी’ (रोडशोज) आणि संबंधित घटकांशी चर्चा यांच्या माध्यमातून, उद्योग संघटना आणि खाजगी कंपन्यांशी सक्रियपणे संवाद साधत असल्याचे, लिलाव प्रक्रियेच्या संदर्भात बोलताना रेड्डी यांनी सांगितले.
कोळसा मंत्रालयाचे सचिव विक्रम देव दत्त यांनी सदस्यांचे स्वागत केले. गेल्या दोन आर्थिक वर्षांत 1 अब्ज टन कोळसा उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करण्यात 'कॅप्टिव्ह' आणि व्यावसायिक खाणींनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे, त्यांनी यावेळी सांगितले.
कोळसा मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव रुपिंदर ब्रार यांनी 'व्यावसायिक कोळसा खाणकामातील सुधारणा आणि खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवणे’ या विषयावर सादरीकरण केले. समितीच्या सदस्यांनी कोळसा क्षेत्रात सुधारणा करण्याच्या दिशेने मंत्रालय करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली; आणि खासगी क्षेत्राचा सहभाग अधिक वाढवण्यासाठी तसेच व्यावसायिक खाणकामाचा विस्तार आणि पर्यावरण तसेच स्थानिक समुदाय यांच्याशी संबंधित बाबी यांचा समतोल राखण्याबाबत मौल्यवान आणि उपयुक्त सूचना केल्या.
***
SushamaKane / SavitaMhaskar / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2295361)
आगंतुक पटल : 12