श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनसीएस पोर्टल


नॅशनल करिअर सर्व्हिस एनसीएस अर्थात राष्ट्रीय रोजगार सेवा या पोर्टलवर सुरुवातीपासून आतापर्यंत 10.05 कोटींहून अधिक रिक्त जागांची नोंदणी

प्रविष्टि तिथि: 05 AUG 2026 2:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2026 

कामगार आणि रोजगार मंत्रालय राष्ट्रीय रोजगार सेवा एनसीएस राबवत आहे. याचा उद्देश नोकरीच्या शोधात असणारे आणि कर्मचाऱ्यांच्या शोधात असणारे यांना सुविधा देणे तसेच रोजगार सहाय्य सेवा पुरवणे हा आहे; यामध्ये नोकरी शोधणाऱ्यांची नोंदणी, विविध संस्थांकडून रिक्त जागांची माहिती संकलित करणे, व्यावसायिक आणि समुपदेशन मार्गदर्शन आदींचा समावेश आहे. राष्ट्रीय रोजगार सेवा आता नॅशनल करिअर सर्व्हिस एनसीएस  मध्ये रूपांतरित करण्यात आली आहे. एनसीएस पोर्टल हे [www.ncs.gov.in]. या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे करिअर-संबंधित सेवा पुरवणारे एक वन-स्टॉप सोल्युशन अर्थात सर्वसमावेशक व्यासपीठ आहे. यामध्ये खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकऱ्या, ऑनलाइन व ऑफलाइन रोजगार मेळाव्यांची माहिती, नोकरी शोधणे व योग्य नोकरी जोडणे, व्यवसाय  समुपदेशन, व्यावसायिक मार्गदर्शन, कौशल्य विकास अभ्यासक्रम आणि कौशल्य/प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती इत्यादींचा समावेश आहे.

एनसीएस पोर्टलवर सुरुवातीपासून आतापर्यंत 6.64 कोटींहून अधिक नोकरी शोधणाऱ्यांनी नोंदणी केली आहे, ज्यापैकी 15-07-2026 रोजी 2.89 कोटी नोकरी शोधणारे सक्रिय होते. तसेच, पोर्टलवर सुरुवातीपासून 10.05 कोटींहून अधिक रिक्त जागांची नोंदणी झाली आहे, ज्यापैकी 15-07-2026 रोजी 17.68 लाख रिक्त जागा सक्रिय होत्या. देशभरातील एनसीएस पोर्टलवर नोंदणीकृत नोकरी शोधणारे, नियुक्ती करणारे आणि उपलब्ध रिक्त जागांचा राज्य/केंद्रशासित प्रदेशनिहाय तपशील  https://www.ncs.gov.in/_layouts/15/ncsp/ViewStaticReport.aspx येथे पाहता येईल.

पोर्टलमध्ये सुधारणा करणे ही एक निरंतर आणि गतिमान प्रक्रिया आहे. गरजेनुसार आणि उपलब्ध अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून आवश्यक ते बदल किंवा अपडेट्स केली जातात. एनसीएस पोर्टलला क्लाउड आधारित आणि ओपन-आर्किटेक्चर प्लॅटफॉर्ममध्ये अपग्रेड करण्यात आले आहे आणि त्यातील सुधारणा ही एक निरंतर प्रक्रिया आहे. बदलत्या गरजांनुसार आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन सुधारणा व अपडेट्स केली जातात. या श्रेणीसुधारणेमध्ये विविध सार्वजनिक आणि खाजगी नोकरी व कौशल्य पोर्टलशी एकत्रीकरण, कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित प्रगत वैशिष्ट्ये जसे की (इंटेलिजंट जॉब मॅचिंग, कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे कौशल्यातील तफावतीचे विश्लेषण, व्यक्तीगत नोकरीच्या शिफारसी, कृत्रिम बुद्धीमत्ता  मुलाखत मार्गदर्शक, भाषिणी  द्वारे बहुभाषिक सुविधा इत्यादी), नोकरी शोधणारे आणि नियुक्ती करणारे यांच्यासाठी क्लाउड-आधारित ॲप्लिकेशन्स, मजबूत पडताळणी यंत्रणा आणि सुलभता व वापरकर्ता अनुभव सुधारण्यासाठी मोबाइल ॲप्लिकेशन सुरू करणे यांचा समावेश आहे. प्रत्येक वित्त आयोगाच्या कार्यकाळाची सुरुवात होण्यापूर्वी, सर्व योजना आणि कार्यक्रमांची सुसंगतता, परिणामकारकता आणि बदलत्या प्राधान्यक्रमांशी असलेली सांगड कायम राखली जावी, यासाठी सरकार त्यांची पद्धतशीरपणे समीक्षा आणि मूल्यमापन करते.

या व्यतिरिक्त, नोकरी शोधणाऱ्या सर्वांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्याच्या उद्देशाने सार्वजनिक-खाजगी भागीदारी  बळकट करण्यासाठी, मंत्रालयाने खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील नियुक्ती करणारे पोर्टल्स आणि प्लॅटफॉर्म्स यांच्याशी अनेक सामंजस्य करार केले आहेत. आतापर्यंत 40 हून अधिक सामंजस्य करार करण्यात आले आहेत; यामध्ये अपना अर्थात एपीएनए, स्विगी, रॅपिडो, झोमॅटो, ॲमेझॉन, टीसीएस आयऑन, क्विकर, फाउंडइट/मॉन्स्टर यांसारख्या खाजगी भागीदारांचा समावेश आहे. या करारांतर्गत एनसीएस पोर्टलवर रोजगार मेळाव्यांची माहिती, कौशल्य विकास कार्यक्रम आणि करिअर समुपदेशन यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

एनसीएस पोर्टल हे उद्यम, ई-श्रम, स्किल इंडिया डिजिटल हब , ईपीएफओ, ईएसआयसी, एमएचआरडी, डिजीलॉकर यांसारख्या विविध सरकारी पोर्टल्सशी जोडलेले आहे. तसेच, हे पोर्टल केंद्रीय लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ आणि रेल्वे भरती मंडळे यांसारख्या सरकारी भरती संस्थांशीही जोडलेले आहे.

एनसीएस प्रकल्पांतर्गत,देशातील रोजगार कार्यालयांचे रूपांतर करून मॉडेल करिअर सेंटर्स स्थापन करण्याची संकल्पनाही मांडण्यात आली होती. राज्य सरकारे आणि इतर संस्थांच्या सहकार्याने व विविध उपक्रमांद्वारे, ही केंद्रे नोकरी शोधणारे आणि नियुक्ती करणारे यांना करिअरविषयक सेवा पुरवतात; यामध्ये ऑनलाइन/ऑफलाइन रोजगार मेळावे आयोजित करणे, नोकरी देणाऱ्यांना सहभागी करून घेणे आणि स्थानिक पातळीवर ऑनलाइन/ऑफलाइन करिअर समुपदेशन देणे यांचा समावेश आहे. सरकारने आतापर्यंत 407 मॉडेल करिअर सेंटर्सना मंजुरी दिली आहे; यामध्ये एमसीसीएस मध्ये रुपांतरीत करण्यात आलेल्या 370 रोजगार कार्यालयांचा समावेश आहे.

तसेच, सध्या 31 राज्ये/केंद्रशासित प्रदेश एनसीएस पोर्टलशी जोडले गेले आहेत, ज्यापैकी 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेश थेट एनसीएस पोर्टलचा वापर करत आहेत.

ही माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी 3 ऑगस्ट 2026 रोजी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात दिली.


नेहा कुलकर्णी/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2294773) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Gujarati , Urdu , हिन्दी , Tamil , Telugu