शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

युवा संगम टप्पा VII साठी 4 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाईन नोंदणी सुरू

प्रविष्टि तिथि: 04 AUG 2026 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2026 

शिक्षण मंत्रालयाने आज ‘एक भारत श्रेष्ठ भारत (ईबीएसबी)’ उपक्रमांतर्गत युवा संगम टप्पा VII साठी ऑनलाइन नोंदणी पोर्टल सुरू केले. उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी, एनएसएस/एनवायकेएस स्वयंसेवक आणि तरुण व्यावसायिक यांच्यासह 18-30 वर्षे वयोगटातील इच्छुक युवा पुढील अधिकृत पोर्टलद्वारे नोंदणी करण्यासाठी पात्र आहेत:  https://ebsb.aicte-india.org

युवा संगम टप्पा  VII साठी नोंदणीची अंतिम तारीख 18 ऑगस्ट 2026 आहे.

युवा संगम टप्पा VII, या आदान-प्रदान कार्यक्रमाचे आयोजन आणि सुसूत्रीकरण करण्यासाठी 20 उच्च शिक्षण संस्था (एचईआय), म्हणजेच, आयआयटी, आयआयएम, केंद्रीय विद्यापीठे आणि एनआयटी यांची 'नोडल संस्था' म्हणून निवड करण्यात आली आहे. निवड झालेले सहभागी त्यांच्याशी संबंधित राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाच ते सात दिवसांच्या (प्रवासाचे दिवस वगळून) शैक्षणिक आणि सांस्कृतिक दौऱ्यांवर जातील. तिथे त्यांना स्थानिक परंपरा, शैक्षणिक संस्था, प्रशासकीय उपक्रम, नावीन्यपूर्ण परिसंस्था, उद्योग, वारसा स्थळे आणि सामुदायिक जीवन याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल.

युवा संगम टप्पा VII साठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांची जोडी:

S. No.

State

Proposed paired HEIs

Paired State

Proposed paired HEIs

1

Uttar Pradesh

BHU Varanasi

Keralam

IIT Palakkad

2

Madhya Pradesh

SPA Bhopal

Karnataka

CU Karnataka

3

Assam

IIT Guwahati

Telengana

CU Hyderabad

4

Goa

NIT Goa

Mizoram

CU Mizoram

5

Rajasthan

IIT Jodhpur

Sikkim

Sikkim University

6

J&K, Ladakh

NIT Srinagar

Maharashtra

IIT Bombay

7

West Bengal

IIT Kharagpur

Uttarakhand

HBNU, Srinagar

8

Chandigarh

IISER Mohali

Gujarat

CU Gujarat

9

Himachal Pradesh

NIT Hamirpur

Odisha

IIM Sambalpur

10

Delhi

Delhi University

Tamil Nadu

CU Tamil Nadu

'युवा संगम' हा शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाचा एक प्रमुख 'युवा आदान-प्रदान कार्यक्रम' आहे. याचा उद्देश विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील युवा नागरिकांमध्ये भावनिक बंध दृढ करणे आणि परस्पर सामंजस्य वाढवणे, हा आहे. हा उपक्रम सहभागींसाठी निश्चित केलेली राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील नियोजित परस्पर भेटींना चालना देऊन 'विविधतेतील एकता' या भावनेचा प्रसार करतो. यामुळे सहभागींना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक, भाषिक, शैक्षणिक आणि विकासात्मक विविधतेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. 

देशभरातील तरुणांनी भारताच्या चैतन्यमय विविधतेचा अनुभव घेण्यासाठी, विविध प्रदेशातील समवयस्कांशी संवाद साधण्यासाठी आणि 'एक भारत श्रेष्ठ भारत' या संकल्पनेचे दूत बनण्यासाठी या अनोख्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण मंत्रालयाने केले आहे.

माधुरी पांगे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2294581) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Kannada , Malayalam