अल्पसंख्यांक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शीख समाजाचे सामाजिक-आर्थिक सक्षमीकरण

प्रविष्टि तिथि: 03 AUG 2026 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2026 

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय संपूर्ण भारतातील सहा अधिसूचित अल्पसंख्याक समुदायांची सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती सुधारण्यासाठी 'प्रधानमंत्री विरासत का संवर्धन' (पीएम विकास) योजना राबवत आहे. पीएम विकास योजना ही या मंत्रालयाची केंद्रीय क्षेत्रातील योजना असून या योजनेअंतर्गत राज्यनिहाय निधीचे वाटप करण्यात आलेले नाही. कौशल्य आणि प्रशिक्षण, नेतृत्व आणि उद्योजकता तसेच शिक्षण यांसारख्या विविध घटकांच्या अंमलबजावणीसाठी मंत्रालयाने निवडलेल्या पात्र प्रकल्प अंमलबजावणी संस्था (पीआयए), सरकारी संस्था, केंद्र आणि राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू), अल्पसंख्याक समुदाय संस्था, राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था आणि प्रतिष्ठित संस्थांमार्फत ही योजना राबवली जाते.

पीएम विकास योजनेअंतर्गत 31 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 59 पीआयएना 1.56 लाख लाभार्थ्यांचे लक्ष्य वाटप करण्यात आले आहे, त्यापैकी दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीला (डीएसजीएमसी) एकूण 31,600 उमेदवारांचे लक्ष्य देण्यात आले होते. आतापर्यंत पीएम विकास योजनेअंतर्गत 32,138 उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, त्यापैकी 11,217 उमेदवार शीख समुदायाचे असून त्यात 5655 पुरुष आणि 5562 महिलांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळाच्या (एनएमडीएफसी) विविध कर्ज योजनांअंतर्गत, 2025-26 या आर्थिक वर्षात शीख समुदायातील 972 लाभार्थ्यांना 15.19 कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली आहे.

ही माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.

शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2293821) आगंतुक पटल : 21
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Tamil