पंतप्रधान कार्यालय
नशामुक्त युवा - विकसित भारत संकल्प अभियानच्या शुभारंभप्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलेल्या भाषणाची क्षणचित्रे पंतप्रधानांनी सामायिक केली
Posted On:
02 AUG 2026 8:41PM by PIB Mumbai
नशामुक्त युवा – विकसित भारत संकल्प अभियानच्या शुभारंभप्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलेल्या आपल्या भाषणातील क्षणचित्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केली आहेत.
एक्सवरील संदेशांच्या एका मालिकेत पंतप्रधान म्हणाले की,
काशीच्या पवित्र भूमीतून उदयास आलेला हा कल्याणकारी विचार आता राष्ट्रीय प्रकल्प बनला आहे. नशामुक्त युवा - विकसित भारत संकल्प अभियान सामूहिक ताकदीच्या बळावर प्रत्येक युवा मनापर्यंत पोहोचेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.
अमली पदार्थ क्षणिक आनंदाची अनुभूती देतात; मात्र ते कारकीर्द आणि कौटुंबिक जीवनाला अधोगतीच्या दिशेने नेतात. त्यामुळे आपल्या युवकांनी नशामुक्त राहून आपल्या क्षमता जपल्या पाहिजेत.
नशा मुक्तीच्या दिशेने देशभरातील महाविद्यालये आणि विद्यापीठांतील आपल्या प्राध्यापकांना माझे हे विशेष आवाहन आहे.
***
सुषमा काणे/राज दळेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2293539)
अभ्यागत कक्ष : 105
Read this releasein:
Odia
,
Telugu
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Malayalam