संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्लीत चौथ्या त्रि-सेवा भविष्यकालीन युद्धकला अभ्यासक्रमाला होणार प्रारंभ

प्रविष्टि तिथि: 02 AUG 2026 4:11PM by PIB Mumbai


त्रि-सेवा भविष्यकालीन युद्धकला अभ्यासक्रमाची (फ्युचर वॉरफेअर कोर्स) चौथी आवृत्ती 3 ऑगस्ट 2026 पासून नवी दिल्लीतील माणेकशा सेंटर येथे सुरू होत आहे. हा चार आठवड्यांचा अभ्यासक्रम 'हेडक्वार्टर्स इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ'च्या (HQ IDS) संयुक्त विद्यमाने आणि 'सेंटर फॉर जॉइंट वॉरफेअर स्टडीज'च्या (CENJOWS) समन्वयाने आयोजित केला जात आहे.
या अभ्यासक्रमात तिन्ही सैन्यदलांतील अधिकाऱ्यांसोबतच शासकीय संस्था, शैक्षणिक क्षेत्र, उद्योग आणि धोरणात्मक थिंक-टँक्सचे प्रतिनिधी एकत्र येत आहेत. या अभ्यासक्रमात भू-राजकीय घडामोडी, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्वांटम टेक्नॉलॉजी, सायबर व कॉग्निटिव्ह वॉरफेअर, माहिती युद्ध (इन्फॉर्मेशन वॉरफेअर), स्वायत्त प्रणाली , जमीन, सागरी, हवाई आणि अंतराळ क्षेत्रांतील भविष्यातील मोहिमा, ग्रे-झोन ऑपरेशन्स, मल्टी-डोमेन ऑपरेशन्स आणि तंत्रज्ञानावर आधारित युद्धपद्धती यांसारख्या विविध विषयांचा समावेश आहे.
या वेळी सहभागी अधिकाऱ्यांना वरिष्ठ लष्करी अधिकारी, धोरणकर्ते, शास्त्रज्ञ, उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि विषयतज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. भविष्यातील युद्धभूमीवर प्रभाव पाडणाऱ्या मुद्द्यांवर सखोल चर्चा घडवून आणणे आणि उदयोन्मुख आव्हानांची तिन्ही दलांमध्ये एकत्रित व सामायिक समज विकसित करणे, हा या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

***

सुषमा काणे/वैभवी जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2293461) आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Urdu , English , हिन्दी , Tamil , Malayalam