पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महिलांच्या 60 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल प्रिया घांगस यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 02 AUG 2026 12:56AM by PIB Mumbai

 

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिलांच्या 60 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल प्रिया घांगस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी म्हटले आहे की, प्रिया घांगस यांचा हा विजय त्यांच्या उल्लेखनीय कौशल्याचा आणि मानसिक खंबीरपणाचा पुरावा आहे. त्यांनी प्रिया यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

समाजमाध्यम 'एक्स' वरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले, "महिलांच्या 60 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत प्रिया घांगस यांनी भारतासाठी गौरवशाली सुवर्णपदक जिंकले आहे. हा विजय त्यांच्या उल्लेखनीय कौशल्याचा आणि मानसिक खंबीरपणाचा प्रत्यय देणारा आहे. त्यांच्या या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा."

 #CWG2026”  

***

यश राणे/हेमांगी कुलकर्णी 

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2293319) आगंतुक पटल : 4
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Gujarati , Telugu , Kannada , Malayalam