पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महिलांच्या 75 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल लव्हलिना बोर्गोहेन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 02 AUG 2026 12:59AM by PIB Mumbai

 

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिलांच्या 75 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल लव्हलिना बोर्गोहेन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी म्हटले आहे की, लव्हलिना बोर्गोहेन यांनी संपूर्ण स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांनी अभिनंदन करताना, त्यांचे समर्पण आणि सातत्य देशभरातील खेळाडूंना प्रेरणा देत असल्याचे सांगितले.

समाजमाध्यम 'एक्स' वरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले, "महिलांच्या 75 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या लव्हलिना बोर्गोहेन यांचा आपल्याला अभिमान आहे. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांचे समर्पण आणि सातत्य देशभरातील खेळाडूंना प्रेरणा देत राहील."

***

यश राणे/हेमांगी कुलकर्णी /परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2293276) आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Gujarati , Telugu , Malayalam