पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026  मध्ये पुरुषांच्या 60  किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या सचिन सिवाच यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

Posted On: 02 AUG 2026 1:00AM by PIB Mumbai

 

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026  मधील पुरुषांच्या 60  किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या सचिन सिवाच यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी म्हटले आहे की, सचिन सिवाच यांचे हे यश अनेक युवा मुष्टियोद्ध्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यांनी सचिन यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देताना, भविष्यातही ते भारताचे नाव अभिमानाने उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त केला.

समाजमाध्यम 'एक्स' वरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले, "ग्लासगोमध्ये सचिन सिवाचने सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. पुरुषांच्या 60  किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेतील त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. ते अनेक युवा मुष्टियोद्ध्यांना प्रेरणा देतील. त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. त्यांनी कायम भारताची मान उंचावत राहावी, हीच सदिच्छा."

***

यश राणे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2293270) अभ्यागत कक्ष : 39