पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी शहीद उधम सिंग यांना आदरांजली अर्पण करत शेअर केले एक संस्कृत सुभाषित
प्रविष्टि तिथि:
31 JUL 2026 9:12AM by PIB Mumbai
नवी दिल्ली: 31 जुलै 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थोर क्रांतिकारक आणि हुतात्मा उधम सिंह यांना त्यांच्या बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. धैर्य आणि शौर्याचे मूर्तीमंत रुप असलेल्या उधम सिंह यांची जीवन गाथा देशातील प्रत्येक पिढीला मातृभूमीचा सन्मान आणि स्वाभिमान जपण्याची सदैव प्रेरणा देत राहील.
पंतप्रधानांनी पुढील संस्कृत सुभाषित शेअर केले आहे,
“न जातु शौर्यं पुरुषस्य भानुरस्तं गतो भवति कदापि शश्वत्।
यथा पुनस्तपति दिवाकरोऽयं तथा पुनर्विक्रमते स वीरः॥”
पराक्रमाचा सूर्य कधीच कायमचा मावळत नाही. ज्याप्रमाणे सूर्य पुन्हा उगवतो आणि तेजस्वीपणे तळपतो, त्याचप्रमाणे शूर पुरुष आपल्या पराक्रमाने प्रत्येक प्रतिकूल स्थितीवर मात करतो, हा आशय या सुभाषितातून व्यक्त होतो.
'एक्स'वरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणतात;
“थोर क्रांतिकारक शहीद उधम सिंह यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. धैर्य आणि उमेदीचे मूर्तीमंत रुप असलेली त्यांची जीवनगाथा देशातील प्रत्येक पिढीला मातृभूमीचा स्वाभिमान जपण्यासाठी सदैव प्रेरणा देत राहील.
***
अंबादास यादव/मंजिरी गानू/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2292256)
आगंतुक पटल : 12