पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले गुलवीरचे अभिनंदन

Posted On: 29 JUL 2026 9:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,29 जुलै 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकल्याबद्दल गुलवीरचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी गुलवीरच्या जिद्द आणि समर्पणाची प्रशंसा केली आणि त्याला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

X या समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“ग्लासगोमध्ये गुलवीरची चमकदार कामगिरी!

पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. त्याची जिद्द आणि समर्पण प्रशंसनीय आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

#CWG2026” 

राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2291468) अभ्यागत कक्ष : 43