पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांची भूमिका अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषिक सामायिक केले.

प्रविष्टि तिथि: 29 JUL 2026 8:20AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त देशवासियांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षक ज्ञानदान करतानाच आपल्या विद्यार्थ्यांना सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात आणि उत्तम विचार आणि मूल्यांनी त्यांच्या आयुष्याला आकार देतात. प्रत्येकाने आपल्या गुरुंचे आदर्श आपल्या आयुष्यातील मार्गदर्शक शक्ती म्हणून अंगिकारावेत, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.

पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे:

“प्रेरकः सूचकश्चैव वाचको दर्शकस्तथा।

शिक्षकः बोधकश्चैव षडेते गुरवः स्मृताः॥”

जो आपल्याला योग्य दिशा दाखवतो, ज्ञान आणि सत्याचा बोध करून देतो, सदाचाराचा सन्मार्ग दाखवतो, शिक्षण देतो आणि जीवनातील खऱ्या सत्याची जाणीव करुन देतो तो आपल्या स्वयंप्रगतीचा मार्ग प्रशस्त करतो. हेच गुरुचे सहा प्रकार किंवा सहा रूपे मानली जातात, असा या या सुभाषिताचा आशय आहे. 

 पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले आहे:

माझ्या सर्व देशबांधवांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा . गुरु आपल्या शिष्यांना ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात, तसेच त्यांच्यामध्ये चांगले विचार आणि चांगली मूल्ये रुजवतात. चला, आपण त्यांच्या आदर्शांना आपल्या जीवनाची शक्ती बनवूया.

प्रेरकः सूचकश्चैव वाचको दर्शकस्तथा।

शिक्षकः बोधकश्चैव षडेते गुरवः स्मृताः॥”

***

NehaKulkarni / BhaktiSontakke / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2290913) आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Gujarati , Odia , Telugu , Kannada , Malayalam