आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पावसाळ्यातील आजारांचा प्रसार रोखण्यासाठी आणि ते नियंत्रित करण्यासाठी उचललेली पावले

प्रविष्टि तिथि: 28 JUL 2026 8:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 जुलै 2026

 

देशात पावसाळ्यातील आजारांचा प्रसार रोखण्यासाठी आणि ते नियंत्रित करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत, ज्यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे:

  • मलेरियाचे निदान लवकर व्हावे यासाठी आणि त्यावरील संपूर्ण उपचारासाठी, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून राज्यांना/केंद्रशासित प्रदेशांना औषधे आणि निदान करण्याची साधने पुरवली जातात.
  • डेंग्यू आजारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि मोफत निदानासाठी, देशभरात 887 सेंटिनेल सर्व्हिलन्स हॉस्पिटल्स आणि 27 एपेक्स रेफरल लॅबोरेटरीज यांचे जाळे उभारण्यात आले आहे. केंद्र सरकार पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेमार्फत सर्व संबंधित प्रयोगशाळांना IgM चाचणीचे किट पुरवते.
  • लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमांतर्गत, उपकरणे आणि आवश्यक सामग्रीच्या खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देऊन निदानसंबंधी 5  प्रयोगशाळांचे जाळे बळकट करण्यात आले आहे.
  • तळागाळातील भागात पोहोच वाढवण्यासाठी क्षमता बांधणी, तसेच प्रशिक्षक, समुदाय नेते आणि कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
  • एकात्मिक रोगवाहक कीटक  व्यवस्थापन, ज्यामध्ये निवडक उच्च-जोखीम असलेल्या भागात घरांमध्ये कीटकनाशकांची फवारणी, मलेरियाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या भागात मच्छरदाण्यांचा वापर, अळ्या खाणाऱ्या माशांचा वापर आणि शहरी भागात अळ्या-प्रतिबंधक उपाययोजना, जसे की जैव-कीटकनाशके, किरकोळ पर्यावरणीय उपाय आणि डासांची पैदास रोखण्यासाठी स्रोत नष्ट करणे यांचा समावेश आहे.
  • अतिसार प्रतिबंधक मोहीम राबवली जात असून त्याचा उद्देश पाच वर्षांखालील मुलांना अतिसारामुळे होणारे आजार कमी करणे आणि मृत्यू रोखणे हा आहे.
  • माहिती, शिक्षण आणि संवाद तसेच वर्तनातील बदलाबाबत संवाद यांवर लक्ष केंद्रित करणारे पूरक उपक्रम राबवणे; तसेच सोशल मीडिया, रेडिओ, वर्तमानपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसह विविध व्यासपीठांद्वारे सार्वजनिक आरोग्यविषयक संदेशांचा प्रसार करणे.
  • मलेरिया आणि इतर रोगवाहक आजारांच्या प्रतिबंधासाठी आणि  नियंत्रणासाठी स्वच्छतेत वाढ करणे, डास नियंत्रण उपाययोजना बळकट करणे आणि जनजागृती वाढवणे यांसाठी सरकार राज्यांचे आरोग्य विभाग आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी सक्रियपणे संवाद साधत आहे.
  • राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना नियमितपणे सूचना जारी केल्या जात आहेत.
  • राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राद्वारे लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

निलिमा चितळे/पर्णिका हेदवकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2290769) आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Tamil