पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी आसाममधील पूरस्थितीचा राज्यातील खासदारांसमवेत घेतला आढावा

Posted On: 28 JUL 2026 3:39PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 जुलै 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील खासदारांची बैठक आयोजित केली आणि राज्याच्या  विविध भागांतील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.

पुरामुळे बाधित नागरिकांना सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकार आसाम सरकारसमवेत काम करत  असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.

X वरील एका पोस्टमध्ये मोदी म्हणाले:

“आसाममधील खासदारांची भेट घेतली आणि राज्याच्या विविध भागातील पूर स्थितीचा आढावा घेतला.

पुरामुळे बाधित नागरिकांना सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकार आसाम सरकारबरोबर काम करत आहे. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो."

 

 

* * *

निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2290418) अभ्यागत कक्ष : 42