पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल भारोत्तोलक मीराबाई चानू हिचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 26 JUL 2026 9:40PM by PIB Mumbai

 

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील 48 किलोग्रॅम गटात सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल भारोत्तोलक मीराबाई चानू हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  अभिनंदन केले.

पंतप्रधान म्हणाले की, मीराबाई चानू हिने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करीत आपल्या कौशल्याची प्रचिती दिली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. मोदी यांनी नमूद केले की, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सलग सुवर्ण पदके जिंकत आणि या स्पर्धांमध्ये आजवर एकूण चार पदके आपल्या नावावर जमा करत, मीराबाई प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी क्रीडापटू ठरली आहे.

पंतप्रधानांनी भावी वाटचालीसाठी मीराबाई चानू हिला उत्तमोत्तम शुभेच्छा दिल्या आहेत.

समाज माध्यम X वरील एका संदेशात मोदी म्हणाले,

"भारतीय भारोत्तोलनाच्या इतिहासातील आणखी एक गौरवशाली अध्याय!

प्रतिभावान मीराबाई चानू यांनी 48 किग्रॅ गटात शानदार कामगिरी करत  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकून आपल्या कौशल्याचा ठसा उमटविला आहे. सलग दोन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्ण पदके आणि एकूण चौथे राष्ट्रकुल पदक आपल्या नावावर नोंदवत ती प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्थान ठरली आहे. तिचे मनःपूर्वक अभिनंदन! भावी वाटचालीसाठी उत्तमोत्तम शुभेच्छा. #CWG2026

@mirabai_chanu”

***

शैलेश पाटील/रेश्मा बेडेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2289730) आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Assamese