पंतप्रधान कार्यालय
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सारनाथचा समावेश झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
Posted On:
25 JUL 2026 7:05PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील सारनाथचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत, हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे.
भगवान बुद्धांशी सारनाथचा अतिशय जवळचा संबंध असून, त्यांचा ज्ञान, करुणा आणि सामंजस्याचा कालातीत संदेश संपूर्ण जगाला प्रेरणा देत असल्याचे त्यांनी नमूद केले.
हा सन्मान भारताच्या समृद्ध संस्कृतीचा आणि आध्यात्मिक वारशाचा गौरव करणारा असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. तसेच, यामुळे जगभरातील अधिकाधिक लोकांना सारनाथला भेट देण्याची आणि भगवान बुद्धांच्या आदर्शांशी जोडले जाण्याची प्रेरणा मिळेल, असेही त्यांनी म्हटले.
एक्सवरील एका संदेशात पंतप्रधान म्हणाले की,
"प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण आहे! उत्तर प्रदेशातील सारनाथचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्यामुळे मला अतिशय आनंद आहे. भगवान बुद्धांशी सारनाथचा अतिशय जवळचा संबंध असून, त्यांचा ज्ञान, करुणा आणि सामंजस्याचा कालातीत संदेश संपूर्ण जगाला प्रेरणा देतो. हा सन्मान भारताच्या समृद्ध संस्कृतीचा आणि आध्यात्मिक वारशाचा गौरव करणारा आहे. तसेच, यामुळे जगभरातील अधिकाधिक लोकांना सारनाथला भेट देण्याची आणि भगवान बुद्धांच्या आदर्शांशी जोडले जाण्याची प्रेरणा मिळेल."
***
राधिका अघोर/राज दळेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2289484)
अभ्यागत कक्ष : 46
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Malayalam