खते विभाग
azadi ka amrit mahotsav

खरीप हंगाम 2026 दरम्यान सर्व राज्यांमध्ये खतांची वेळेवर आणि पुरेशी उपलब्धता असेल याची सरकारतर्फे सुनिश्चिती

प्रविष्टि तिथि: 24 JUL 2026 3:16PM by PIB Mumbai


नवी दिल्ली 24 जुलै 2026

केंद्र सरकारने प्रत्येक पीक हंगामात, देशभरात खतांची वेळेवर आणि पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी एक सशक्त यंत्रणा राबवत असल्याचा पुनरुच्चार केला आहे. वेळेअगोदर केलेले नियोजन, सातत्यपूर्ण निरीक्षण आणि सर्व राज्य सरकारांसोबत समन्वयित कार्यवाही यांच्या माध्यमातून विद्यमान खरीप 2026 हंगामादरम्यान सर्व राज्यांमध्ये युरिया, डीएपी, एमओपी तसेच एनपीकेएस यांसारख्या सर्व प्रमुख खतांची पुरेशी उपलब्धता असेल याची दक्षता घेण्यात आली आहे.
खतांची अखंडित उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय कृषी आणि शेतकरी विकास विभाग  राज्य सरकारांशी चर्चा करून प्रत्येक पीक हंगामाआधी राज्य-निहाय तसेच महिना-निहाय खतांच्या गरजेचे मूल्यांकन करतो. या अंदाजांच्या आधारावर, केंद्रीय खते विभाग मासिक पुरवठा योजनेबरहुकूम खतांचा पुरवठा निश्चित करतो आणि खतांच्या उपलब्धतेवर सतत लक्ष ठेवतो. एकात्मिक खते व्यवस्थापन  प्रणालीच्या  माध्यमातून अनुदानित खतांच्या साठ्याच्या वाहतुकीचा मागोवा घेतला जातो तर राज्यांच्या कृषी अधिकाऱ्यांसमवेत होणाऱ्या नियमित साप्ताहिक आढावा बैठकांमुळे पुरवठ्याबाबत उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी मदत होते. खतांच्या राज्यांतर्गत वितरणाचे व्यवस्थापन संबंधित राज्य सरकारांद्वारे केले जाते.
शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे असलेले डीएपी हे खत 50 किलोच्या एका पोत्यासाठी 1350 रुपये इतक्या किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्यासाठी या वितरण पद्धतीतील, कारखान्यापासून शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचण्याचा खर्च, आंतरराष्ट्रीय दरांचे फायदे/तोटे यांसारखे ‘इतर खर्च’ भरून काढण्याच्या उद्देशाने 3500 रुपये प्रती टनची विशेष तरतूद तसेच कमाल किरकोळ किमतीमध्ये (एमआरपी) जीएसटी घटकाचा अंतर्भाव करण्यासाठीची तरतूद आणि खरीप हंगाम 2026 मध्ये खतांच्या किंमती स्थिर राखण्यासाठी आयात केलेल्या तसेच देशांतर्गत उत्पादित अशा दोन्ही डीएपी तसेच आयात टीएसपी वर एनबीएस अनुदानाव्यतिरिक्त निव्वळ एमआरपी (एमआरपी-जीएसटी)च्या 4% च्या वाजवी परताव्यासाठीची तरतूद अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लिखित उत्तरात केंद्रीय रसायने आणि खते विभागाचे मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज ही माहिती दिली.

***

सुषमा काणे/संजना चिटणीस/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2288944) आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Tamil , English , Urdu , हिन्दी , Gujarati