कायदा आणि न्याय मंत्रालय
अधिवक्ता (सुधारणा) विधेयक, 2026 चा मसुदा हितधारक आणि सार्वजनिक विचारविनिमयासाठी करण्यात आला जाहीर
प्रविष्टि तिथि:
20 JUL 2026 7:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,20 जुलै 2026
बार कौन्सिल ऑफ इंडिया (बीसीआय) सोबतच्या सल्ल्याने तयार करण्यात आलेला अधिवक्ता (सुधारणा) विधेयक, 2026 चा मसुदा बीसीआयने हितधारकांच्या विचारविमर्शासाठी मांडला आहे.
बार कौन्सिल ऑफ इंडियाने सर्व हितधारकांकडून अभिप्राय आणि सूचना मागवण्यासाठी 18 जुलै, 2026 रोजी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर 'वकील (सुधारणा) विधेयक, 2026' चा मसुदा प्रसिद्ध केला आहे. मसुदा विधेयक येथे पाहता येईल :
https://www.barcouncilofindia.org/home.
सर्व हितधारकांना आणि जनतेला विनंती आहे की मसुदा विधेयकावर त्यांच्या काही टिप्पण्या/सूचना असल्यास त्या बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे 31 जुलै, 2026 रोजी दुपारी 03 00 वाजेपर्यंत draftadvact2026bill[at]gmail[dot]com आणि lmpcell-dla[at]nic[dot]in इथे सादर केल्या जाव्यात.
विचारविनिमय प्रक्रियेदरम्यान मिळालेल्या सूचनांची तपासणी केली जाईल. विधी व्यवसायाच्या बदलत्या गरजांनुसार तसेच 'विकसित भारत @2048' ची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हा विभाग एका पारदर्शक, सहभागी आणि सल्लामसलतपूर्ण कायदेशीर प्रक्रियेसाठी कटिबद्ध आहे.
राधिका अघोर/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2286786)
आगंतुक पटल : 22