राज्यसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

राज्यसभेचे अध्यक्ष सी.पी.राधाकृष्णन यांनी आज सभागृहात अधिवेशनाच्या प्रारंभी केलेले निवेदन

प्रविष्टि तिथि: 20 JUL 2026 4:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जुलै 2026

अध्यक्ष: सन्माननीय सदस्यहो, संपूर्ण सभागृहाच्या आणि माझ्या वतीने मी नवनियुक्त सदस्यांचे स्वागत करतो. तसेच, राज्यसभेच्या  271 व्या अधिवेशनाला आरंभ होत असल्यानिमित्ताने मी तुम्हा सर्वांचेच मनापासून स्वागत करतो.

या सभागृहाला अर्थपूर्ण चर्चांची गौरवशाली परंपरा आहे आणि मला खात्री आहे की, या अधिवेशनाही ती परंपरा कायम राखली जाईल. आपल्याकडे अधिवेशनात सभागृहाच्या कामकाजासाठी 19 सत्रे असून देशासाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी या मौल्यवान वेळेचा सदुपयोग करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

सन्माननीय सदस्यहो, या अधिवेशनापासून सचिवालयाने सदस्यांच्या आसनांवरील मल्टी-मीडिया उपकरणांच्या माध्यमातून सभागृहातील कामकाजाचे 'एआय' च्या मदतीने थेट आणि तत्काळ नऊ भाषांमध्ये भाषांतर उपलब्ध करून देण्याची सोय केली आहे. ही सुविधा टप्प्याटप्प्याने वाढवून संविधानातील सर्व बावीस अनुसूचित भाषांसाठीही उपलब्ध करून जाईल. या सुविधेमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी आपला अभिप्राय कळवावा, असे सदस्यांना आवाहन आहे.

या अधिवेशनासाठी महत्त्वाची वैधानिक आणि विचारविनिमयाची कार्यक्रमपत्रिका ठरविण्यात आली आहे. माझी सदस्यांना विनंती आहे की त्यांनी कामकाज वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा; कारण येणाऱ्या प्रत्येक व्यत्ययामुळे देश आणि आपण ज्यांचे प्रतिनिधित्व करतो त्या जनतेवर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांवरील चर्चेला विलंब होतो.

मी सभागृहातील सर्व पक्षांच्या सदस्यांना आवाहन करतो की, त्यांनी या संस्थेची प्रतिष्ठा, शिस्त आणि मानमर्यादा जपावी. संसदीय लोकशाहीत मतभेद असणे स्वाभाविक असले, तरी ते सभागृहाचे पावित्र्य जपले जाईल अशा प्रकारे मांडले जावेत. सभागृहाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होईल असे अडथळे आणता कामा नयेत.

या शब्दांसह, अधिवेशन फलदायी आणि विधायक ठरावे यासाठी मी तुम्हा सर्वांना  शुभेच्छा देतो.

राधिका अघोर/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर

 

  सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2286606) आगंतुक पटल : 23
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Kannada